अ‍ॅग्रो

एकात्‍मिक बहुवीध शेतीतून  आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल 

विनोद इंगोले

केळी पिकातून समृद्धीची 
वाट चोखाळणाऱ्या अंजनगाव सुर्जी (जि. अमरावती) येथील येऊल बंधूंनी एकात्‍मिक शेतीचा मार्ग स्वीकारला आहे. लिंबू, भाडेतत्त्वावर भाजीपाला शेती, पोल्ट्री, शेळीपालन आदींच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवत आर्थिक वहिवाट प्रशस्त करण्यात यश आले आहे. 

अमरावती जिल्ह्यातील  अंजनगावसूर्जी परिसरात कधीकाळी पानमळे मोठ्या संख्येने होते. एकूण वहितीखाली असलेल्या क्षेत्राच्या सुमारे ४० टक्‍के क्षेत्रावर या पिकाचे क्षेत्र होते. पुढे मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने हे क्षेत्र आज २० टक्‍क्‍यांवर आले आहे. उत्पादित पानाची विक्री भुसावळमध्ये व्हायची. आजही भुसावळला येथून माल जातो. त्यासोबतच औषधी गुणधर्म असलेल्या पानपिंपरीचेही या भागात उत्पादन होते. 

शेळीपालन 
डिसेंबर २०१७ मध्ये शेळीपालनास सुरवात केली. सिरोही, सोजत तसेच गावरान जातीच्या शेळ्या आहेत. सात महिने वयाच्या नराची प्रतिनग साडेतीन हजार ते पाचहजार रुपये दराने विक्री केली आहे. सोमवारी अंजनगाव येथे भरणाऱ्या जनावरांच्या बाजारातच विक्री करण्यावर भर असतो. 

येऊल बंधूंची शेती
गावातील प्रमोद आणि शाम या येऊल बंधूंची १६ एकर शेती आहे. त्यांचे मुख्य व जुने पीक म्हणजे अडीच एकरांत असलेली केळी. तीन वर्षे झालेली सहा एकर लिंबूबागही आता व्यावसायिक उत्पन्नासाठी सज्ज होईल. साडेसात एकरांवर केळीची नवी लागवड केली जाणार अाहे. 

अकोट (जि. अकोला) येथील नरनाळा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून यावर्षी अकोला व अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील केळी इराणला निर्यात करण्याचा प्रयत्न झाला.  येऊन बंधूंनीही ४५ टन केळी त्या माध्यमातून परदेशात पाठवली. या माध्यमातून देशांतर्गत बाजारभावापेक्षा दीड रुपया जास्तीचा म्हणजे साडेअकरा रुपये प्रतिकिलो दर मिळाला. 

काही वर्षांपासून हे कुटुंब वांगी, फ्लॉवर, कोबी घ्यायचे. हिरव्या वांग्यांना नागपूर बाजारात मागणीही असायची. अलीकडील काळात सुमारे ४० एकरांवर भाडेतत्त्वावर भाजीपाला घेण्यात येतो.

यंदा व्यापाऱ्याला बाग देण्याऐवजी लिंबाच्या थेट विक्रीचा पर्याय ठेवला. तो फायदेशीर ठरत पहिल्यावर्षी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.  

झेंडू लागवडीत गेल्या सात वर्षांपासून सातत्य आहे. सन २०१३ मध्ये भाडेतत्त्वावरील शेतीत सुमारे १२ एकरांवर झेंडू होता. आता सुमारे दोन एकर क्षेत्र असते. गणपती, दसरा या काळात विक्रीसाठी लागवडीचे नियोजन केले जाते. नवरात्रीच्या सुमारास किलोला ५० रुपये या दराने दर बांधून घेण्यात येतो. ही फुले नजीकच्या संस्थानाला दिली जातात.  

विविध पिकांची लागवड पाहाता १६ एकरांवरील व्यवस्थापनासाठी तीन विहिरी आहेत. 
संपूर्ण क्षेत्र ठिबकखाली आणले आहे.  
जमिनीचा पोत राखण्यासाठी शेणखताचा एकरी वीस ट्रॉलीज या दराने दर दोन वर्षांनी वापर
सुमारे ४० मजुरांची राहण्याची व्यवस्था केली आहे. 
केळीचे मुख्य उत्पन्न मिळवताना अन्य आर्थिक स्त्रोतही मिळवण्यासाठी विविध पर्यायांचा वापर हेच येऊल बंधूंच्या शेतीचे सूत्र आहे. 

पानमळ्याचे गाव वळले केळी पिकाकडे
पानमळ्यांसोबतच अंजनगावला 
केळी पिकानेही ओळख दिली आहे. केळीचे क्षेत्र वाढल्याने रायपनिंग चेंबरची संख्याही सुमारे वीसपर्यंत पोचली आहे. 
पाणी आणि बाजारपेठेची उपलब्धता हा घटक केळी लागवड क्षेत्रावर परिणाम करणारा ठरला. 

कडकनाथ कोंबडीपालन 
केळी, झेंडू आदींच्या लागवडीत सातत्य राखणाऱ्या येऊल बंधूंनी यावर्षी कडकनाथ कोंबड्यांच्या संगोपनासाठी पोल्ट्रीची उभारणी केली आहे. त्यासाठी ६० बाय ४० फूटाचे शेड उभारले आहे. त्यासाठी साडेचार लाख रुपये खर्च झाला. झाबुआ (मध्य प्रदेश) येथून पहिल्या टप्प्यात एक दिवस वयाच्या एकहजार पक्षांची ७५ रुपये प्रतिनग या दराने खरेदी केली. कडकनाथच्या जोडीला गावरान कोंबड्यांचेही संगोपनदेखील केले जाणार आहे.  

 प्रमोद येऊल, ९४२२२१३३३७,   : शाम येऊल, ९८२२२४३१६१ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT