Fruit Sakal
अ‍ॅग्रो

अपेक्षा फलोत्पादनाच्याः एकात्मिक मूल्यसाखळ्या उभ्या करणे आवश्‍यक

दीर्घकालीन धोरणाची कमतरता; उत्पादन, प्रक्रिया, बाजारपेठ, ब्रँड या टप्प्यावर गुंतवणुकीची गरज

महेंद्र महाजन :सकाळ वृत्तसेवा

अपेक्षा फलोत्पादन क्षेत्राच्याः भाग १

महाराष्ट्रात एकूण पिकांखालील जमिनीपैकी आठ टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर फलोत्पादन पिके आहेत. कृषिपूरक उद्योग वगळता गेल्या दोन वर्षांपूर्वी कृषी क्षेत्राचे उत्पन्न एक लाख ६८ हजार कोटी रुपये होते. त्यात फलोत्पादन क्षेत्राचे उत्पन्न ५५ ते ५८ हजार कोटींच्या आसपास आहे. हे प्रमाण कृषी उत्पन्नाच्या ३५ टक्के आहे. या क्षेत्राला देशी आणि परदेशी बाजारपेठेतील संधीचा परिपूर्ण लाभ घेण्यासाठी आणखी काय करायला हवे? याबद्दलची वृत्तमालिका... (Fruit Production)

नाशिक : राज्यात दूध आणि साखर उद्योगात मूल्यसाखळीच्या तत्त्वानुसार काम झाले आहे. देशस्तरावर ‘अमूल’सारखे शेतकऱ्यांच्या मालकीची, तर जागतिकस्तरावर चिकीता केळी, झेस्प्री किवी, वॉशिंग्टन सफरचंद अशा मूल्यसाखळ्या उभ्या राहिल्या. त्याप्रमाणे जागतिक स्पर्धेत टिकतील अशा फलोत्पादन क्षेत्रातील पीकनिहाय एकात्मिक मूल्यसाखळ्या उभ्या करणे आणि त्यासाठी उत्पादन, प्रक्रिया, बाजारपेठ, ब्रँड अशा सर्व टप्प्यांवर गुंतवणूक आवश्‍यक आहे.

फलोत्पादन क्षेत्रात उत्पादनवाढीसोबत आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादनाची गुणवत्ता लक्षात घ्यावी लागणार आहे. त्यासाठी संशोधन, सुधारित वाण व साधनसामग्रीचा विचार झाल्यास बाजारपेठेतील अपेक्षित वाटा राज्यातील शेतकऱ्यांना मिळवणे शक्य होणार आहे. दुष्काळ, अवेळी आणि अपुरा पाऊस, गारपीट, पूर आदी संकटाचा फटका फलोत्पादन क्षेत्राला बसला आहे. अशा संकटांवर मात करण्यासाठी दीर्घकालीन धोरणाची कमतरता दिसत आहे.

काढणी पश्‍चात गुंतवणूक कमी

काढणी पश्‍चात पातळीवरील गुंतवणूक कमी झाली आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, अपेडा, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने गेल्या २० वर्षांत ५०० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. पण तरीही पायाभूत सुविधा तुलनेत कमी आहेत.

महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्राची वस्तुस्थिती आणि त्यातील संधी व दिशा यासंबंधीचे सादरीकरण राज्याचे मंत्री, नेते व कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे केले आहे. आता फलोत्पादन क्षेत्राला राज्य सरकारकडून धोरणात्मक निर्णयाची आणि प्रत्यक्ष कार्यवाहीची आहे.

- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT