

Mohit Sharma as CSK's New Bowling Coach
Sakal
Chennai Super Kings New Bowling Coach: चेन्नई सुपर किंग्स संघाची (CSK) गेल्या तीन हंगामात फारशी चांगली कामगिरी झालेली नाही. गेल्या तीन हंगामात त्यांनी प्लेऑफही गाठलेली नाही. त्यानंतर आता चेन्नई संघात गेल्यावर्षीपासून अनेक बदलांचे वारे वाहाताना दिसत आहे.
संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यानंतर आता आयपीएल २०२७ आधी कोचिंग स्टाफमध्येही बदल होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी १६ वर्षांनंतर मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानला (Zaheer Khan) मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. आता आणखी एका माजी वेगवान गोलंदाजाचा समावेश कोचिंग स्टाफमध्ये होण्याची शक्यता आहे.