Sita-Ashoka 
अ‍ॅग्रो

औषधी गुणधर्म असलेला वृक्ष - सीता अशोक

डॉ. विक्रम जांभळे, गणेश धोंडे, रमेश खेमनर

मराठी नाव - अशोका
इतर नावे - जासुन्दी, सीता अशोक
संस्कृत नाव - अशोक, हे पुष्प, ताम्रपल्लव, पिंडपुष्प, गंधपुष्प

वनस्पतीचे वर्णन 

  • या वृक्षाला अशोक या नावाने देखील ओळखले जाते. हिंदू आणि बौद्ध धर्मामध्ये अशोकाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. 
  • हा सदाहरित वृक्ष असून, उंची साधारणतः ६ ते १० मीटर असते.
  • पाने १५-२० सेंमी लांब, संयुक्त प्रकारची, पर्णिकेच्या ४-६ जोड्या, लांबट निमुळत्या आकाराची असतात. 
  • फुलांचे झुपके नारंगी किंवा नारंगी- पिवळ्या रंगांचे असतात. 
  • शेंगा चपट्या, चिवट असून त्यात लांबट गोलाकार ४-८ बिया असतात. 
  • या वृक्षाची सावली अत्यंत दाट असते. त्यामुळे याची लागवड बागेत, मंदिराबाहेर तसेच शाळेभोवताली केली जाते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आढळ  

  • ही झाडे आर्द, पानझडी, सदाहरित जंगलात आढळतात.

पुष्प /फळ काळ 

  • जानेवारी ते जून
  • हवामान 
  • उष्ण व समशीतोष्ण हवामान वाढीसाठी पोषक.  

उपयोगी भाग 

  • खोडाची साल व फुले.

जमीन

  • लागवडीसाठी पाण्याच्या निचरा होणारी मध्यम काळी, हलकी जमीन निवडावी. 
  • खडकाळ जमिनीत किंवा डोंगरउतारावर हा वृक्ष वाढत नाही.
  • उष्ण वाऱ्यापासून या झाडाचे संरक्षण करणे गरजेचे असते. 

खड्डे तयार करणे 

  • जमिनीत ५ बाय ५ मीटर अंतरावर ३० × ३० × ४५ सेंमीचे खड्डे करावेत. त्यात पोयटा माती व शेणखत मिसळून भरावे.
  • रोप लागवडीनंतर त्याभोवती आळे करावे.

आंतरमशागत 

  • या वनस्पतीचे पहिले ३ वर्षे तणांपासून व उष्ण हवेपासून संरक्षण करणे गरजेचे असते.
  • झाडांस खते दिल्यानंतर पुरसे पाणी द्यावे.
  • पीक ३-५ वर्षांचे असेपर्यंत यामध्ये आंतरपीक 
  • म्हणून तूर, चवळी, सोयाबीन पिकांची लागवड करता येते.

अभिवृद्धी 

  • या वृक्षाची अभिवृद्धी बिया किंवा कलमांपासून केली जाते.
  • प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये माती व भरपूर शेणखताच्या मिश्रणाने भराव्यात. त्यामध्ये बी पेरावे. बी ३०-४० दिवसांनी चांगले रुजते.
  • रोपे  ४ ते ६ महिन्यांनंतर तयार होतात. तयार रोपांची शेतात लागवड करावी.

लागवड 

  • प्रत्येक खड्ड्यात एक रोप याप्रमाणे लागवड करावी. रोपांच्या बाजूने काठ्या लावाव्यात. जेणेकरून रोपास किमान एक वर्षापर्यंत सावली मिळेल.

सिंचन 

  • आवश्यकतेनुसार ८ ते १५ दिवसांनी पाणी द्यावे. सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी दिल्यास अधिक फायदेशीर ठरते. 

साल काढणी 

  • सीता अशोकाचे झाड साधारणपणे १० ते १२ वर्षांनी साल काढण्यास तयार होते.
  • साल काढताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • झाडाच्या वयानुसार साल काढणे गरजेचे आहे. 
  • साल काढल्यांतर त्याचे तुकडे करून सावलीत सुकवावेत. 

उत्पादन 

  • झाडांच्या वयानुसार अंदाजे १०-१२ किलो साल प्रति वृक्ष मिळते.
  • शोभेसाठी वाढविला जाणारा अशोक (पॉलिॲलथिया लाँगीफोलिया), कांचन (बॉहीनिया व्हेरिगेटा) किंवा टे्रमा ओरिएंटेलिस इत्यादीची साल भेसळ म्हणून वापरली जाते.
  • वाळलेल्या खोडाची साल व फुले दोन वर्षांपर्यंत चांगली राहतात. 

औषधी गुणधर्म व उपयोग

  • अशोक मधुर, सुगंधी, रक्तदोषनाशक आहे.
  • झाडाची साल कडू/तुरट असून तिचा उपयोग पोटदुखी, स्त्रीरोग, अतिसार, कृमी, सूज, जळजळ, अस्थिव्यंग, मूत्रविकारांवर केला जातो. 
  • पित्त तसेच रक्तातील दोष व रक्तविकारावर सालीचा वापर केला जातो. (साल बाहेरून खडबडीत व आतून लाल असते).
  • फुलाचा रस अतिसारावर उपयुक्त असतो. फुलाचे चूर्ण रक्तस्रावावर व मूत्रविकारात उपयोगी पडते. 
  • औषधे - अशोकारिष्ट, अशोकघृत, देवदाव्यारिष्ट, महामरिच्यादि तेल

- डॉ. विक्रम जांभळे, ०२४२६-२४३२९२ (औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar may become Vice President: बिहारमध्ये मोठा ‘GAME’ होणार!, भाजपचा मुख्यमंत्री अन् नितीशकुमार थेट उपराष्ट्रपती?

Indapur Crime : इंदापुर गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी! जबरी चोरीच्या गुन्ह्यासह 22 गुन्ह्यांची उकल; एका अल्पवयीनसह दोघांना अटक

Latest Maharashtra News Updates : मराठी तरुणीला मारहाण प्रकरणी मनसे भाजप पदाधिकारी आक्रमक

Gatari Special Kokani Style Kolambi Biryani: अशी बनवा मस्त मसालेदार 'कोकणी पद्धतीची कोळंबी बिर्याणी', लगेच नोट करा रेसिपी

Pratap Sarnaik: नागपूर-नागभीड ब्रॉड गेज मार्ग लवकरच होणार खुला, परिवहन मंत्र्यांनी 'ती' वेळच सांगितली

SCROLL FOR NEXT