Gatari Special Kokani Style Kolambi Biryani: अशी बनवा मस्त मसालेदार 'कोकणी पद्धतीची कोळंबी बिर्याणी', लगेच नोट करा रेसिपी

Recipe For Kokani Style Prawns Biryani: कोकणातील खाद्यसंस्कृतीत सीफूडला खास महत्त्व आहे, आणि कोळंबी बिर्याणी ही त्यातील एक स्वादिष्ट डिश आहे.
Gatari Special Kokani Style Kolambi Biryani | Prawns Biryani
Gatari Special Kokani Style Kolambi Biryani | Prawns Biryanisakal
Updated on

थोडक्यात:

  1. कोकणी पद्धतीची कोळंबी बिर्याणी ही पारंपरिक मसाले आणि ताज्या कोळंबीपासून तयार होणारी खास सीफूड डिश आहे.

  2. या बिर्याणीमध्ये लवंगा, वेलदोडे, खोबरे, खसखस यांसारख्या मसाल्यांचा समावेश होतो, जे पदार्थाला खास कोकणी चव देतात.

  3. कोळंबी आणि तांदळाचे थर लावून मंद आचेवर ही बिर्याणी शिजवली जाते आणि वाढताना कोथिंबीर घालून सजवली जाते.

Kolambi Biryani Recipe: कोकणी पदार्थ त्यांच्या बनवण्याच्या पद्धती, मसाले आणि विशिष्ट चविमुळे सगळ्यांच्याच पसंतीचे आहेत. त्यामुळे घरात बनणारे कोणतेही कोकणी पदार्थ सगळे अगदी आवडीने खातात. असाच एक पदार्थ म्हणजे कोकणी पद्धतीची कोळंबी बिर्याणी. पारंपरिक मसाले, सुगंधी तांदूळ आणि ताज्या कोळंबीपासून तयार होणारी ही बिर्याणी खवय्यांसाठी एक स्वादिष्ट मेजवानी ठरते. कोकणी पद्धतीने बनवलेल्या या खास बिर्याणीची रेसिपी जाणून घेऊया!

मसाल्याचे साहित्य

६ चमचे तेल, ४ लवंगा, ४ हिरवे वेलदोडे, दालचिनीचे अर्धा इंचाचे २ तुकडे, ४ लसूण पाकळ्या, ३ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, अर्धा वाटी खराखस, अर्धी वाटी सुके खोबरे किसलेले

कोळंबीला लावण्याचा मसाला २ चमचे मीठ, अर्धा चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा आले-लसूण वाटण, अर्धा चमचा वाटलेली चिंच

Gatari Special Kokani Style Kolambi Biryani | Prawns Biryani
Gatari Amavasya 2025: गटारी अमावस्येच खरं नाव काय? अर्थ आणि यंदाची तारीख जाणून घ्या एका क्लिकवर!

इतर साहित्य

५-६ चमचे तेल, अर्धा किलो कोळंबी, १ चमचा वाटलेला लसूण, १ कांदा बारीक चिरून, १ वाटी तांदूळ, २ चमचे तूप, २ चमचे लिंबाचा रस, कोथिंबीर,

कोळंबी बिर्याणी बनवण्याची कृती

प्रथम कोळंबीला लावण्याचा सर्व मसाला एकत्र करावा व कोळंबीला लावून वीस मिनिटे ठेवावा. सहा चमचे तेल गरम करून त्यावर प्रथम लवंगा, वेलदोगे, दालचिनी, लसूण पाकळ्या घालून दोन-तीन मिनिटे चांगले परतून घ्यावे. त्यावर चिरलेला कांदा आणि खसखस घालावी आणि कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. त्यावर खोब-याचा कीस घालावा, हे सर्व मिश्रण चॉकलेटी रंग येईपर्यंत परतून घ्यावे.

Gatari Special Kokani Style Kolambi Biryani | Prawns Biryani
Gatari Special Kala Mutton: गटारी अमावस्येला बनवा सोप्यात सोपं अन् झटपट बनणारं काळं मटण

परतलेले हे मिश्रण गार होईपर्यंत ठेवून द्यावे. त्यानंतर अर्धी वाटी पाण्यात बारीक वाटून घ्यावे. तांदूळ स्वच्छ धुवून, गरम पाण्यात एक तास भिजत घालून झाकून ठेवावे. मोठ्या जाड बुडाच्या भांड्यात तेल घालून त्यावर वाटलेला लसूण घालून चांगले परतून घ्यावे त्यावर कांदा चांगला परतून घ्यावा.

मग मसाला लावलेली कोळंबी त्यावर घालावी आणि गॅस मोठा करून झाकण लावून एक वाफ आणावी, यात तांदूळ आणि तांदूळ भिजवलेले पाणी लागेल तितके घालून सगळे मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. एक उकळी आल्यावर त्यात वाटलेला मसाला आणि तूप घालावे, चवीप्रमाणे मीठ आणि तिखट घालावे. लिंबाचा रस घालून झाकण ठेवून मंद आचेवर ही खिचडी शिजू द्यावी. वाढताना वरून कोथिंबीर पेरावी.

FAQs

  1. कोकणी कोळंबी बिर्याणीमध्ये कोणते खास मसाले वापरले जातात?
    (What special spices are used in Kokani Kolambi Biryani?)
    या बिर्याणीमध्ये लवंगा, वेलदोडे, दालचिनी, खसखस, सुके खोबरे, आले-लसूण वाटण, आणि चिंच वापरली जाते.

  2. कोळंबी किती वेळ मॅरिनेट करावी लागते?
    (How long should the prawns be marinated?)
    कोळंबी सुमारे २० मिनिटे मसाल्यात मॅरिनेट करून ठेवावी.

  3. बिर्याणीमध्ये कोणता तांदूळ वापरावा?
    (Which rice is best for this biryani?)
    सुगंधी आणि लांब तांदुळाचा वापर (जसे की बासमती) कोकणी कोळंबी बिर्याणीला योग्य टेक्स्चर आणि चव देतो.

  4. ही बिर्याणी शिजवताना काय काळजी घ्यावी?
    (What precautions should be taken while cooking this biryani?)
    बिर्याणी मंद आचेवर झाकण ठेवून शिजवावी आणि पाणी योग्य प्रमाणात घालावे, जेणेकरून ती खिचडीसारखी किंवा कोरडी होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com