pali. 
अ‍ॅग्रो

भात शेतीसाठी सुधारित चतूःसुत्रीचा अवलंब हाच योग्य पर्याय

अमित गवळे

पाली - जिल्ह्यात सर्वत्र भातशेतीची पुर्व मशागत करण्यास बळीराजाची लगबग सुरु झाली आहे. मात्र भात शेतीत अजूनही पारंपरिक राब भाजण्याच्या पद्धतीचाच वापर सुरु आहे. मशागतीची ही अयोग्य पद्धत असून या पद्धतीमुळे प्रदूषण वाढते, वेळ वाया जातो आणि झाडांचीही कत्तल होते. 

भाताचे कोठार समजल्या जाणार्‍या रायगड जिल्ह्यात साधारण 1 लाख १० हजार हेक्टरवर प्रत्यक्ष भाताची लागवड केली जाते. प्रती हेक्टरी सरासरी २६ ते २८ क्विंटल भाताचे उत्पादन घेतले जाते. परंतु अजुनही येथिल बहुतांश शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करत आहे. पुर्व मशागत करतेवळी सर्रास राब / शेतीची भाजणी केली जाते. परंतु हि पद्धत अयोग्य आणि पर्यावरणास धोकादायक अाहे. असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्दयापीठ, दापोली, यांनी संशोधन करून सांगितले आहे. तरी देखील जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हिच पद्धत वापरली जात आहे. याबाबत कृषी  कार्यालयाकडून शेतकर्यांचे प्रबोधन करुन त्यांना या संदर्भात फायदे तोटे सांगितले आहेत. सकाळ देखील मागील काही वर्षांपासून बातम्यांच्या माध्यमातून या बाबत आवाहन करत आहे.

प्रबोधन आणि आवाहन
राब केल्याने / शेतजमीन भाजल्याने तेथिल जमीनीतील शेतीसाठी उपयुक्त सुक्ष्मजीव नष्ट होतात परिणामी शेतीस पोषण व सेंद्रिय घटक मिळत नाही. तसेच राब भाजण्यासाठी झाडांची तोड होते. प्रदुषण वाढते परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडते. त्यामुळे शेतकर्‍यांनी भात लागवडीसाठी चार सुत्री भातशेतीचा अवलंब करावा. तण काढण्यासाठी तणनाशकाचा वापर करावा. यासाठी अधिकाधिक शेतकर्‍यांना वेळोवेळी माहिती पुरविली जात आहे. शेतकर्यांनी राब भाजणी पद्धतीचा अाग्रह करणे टाळावे. असे अावाहन कृषी कार्यालयाकडून करण्यात येते. अशी रायगड जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी सकाळला दिली.

आधुनिक पद्धतीबद्दल गैरसमज 
राब भाजले नाही तर शेतात तण वाढते अशी शेतकऱ्यांची धारणा अाहे. तण नाशकाबद्दल गैरसमज असल्याने त्याचा वापर फारसा केला जात नाही. तण नाशकाची फवारणी करण्यापेक्षा जाळणे सोईचे वाटते. फवारणीसाठी मजुरीही द्यावी लागते म्हणून अधिक पैसे जातात असा गैरसमज.

केवळ तण नियंत्रणासाठी राब
भात पिकात प्रामुख्याने पाखड, धुर, बार्डी, लव्हाळा या तणांचा प्रदुर्भाव दिसुन येतो. रोपवाटीकेतील तणांच्या नियंत्रणासाठी कोकणात 'राब' भाजणे या पारंपारिक पद्धतीचा अवलंब प्रचलित आहे. मात्र हि पद्धत अत्यंत वेळ खाऊ, कष्टप्रद आणि खर्चिक असून पर्यावरणासाठी मारक आहे. शिवाय अशा कामासाठी मजुरांचा तुटवडा सुद्धा जाणवु लागला आहे. भात रोपवाटीकेतील तणांच्या नियंत्रणासाठी अलिकडे तणनाशकांचा वापरही परिणामकारकपणे करण्याचे किफायतशीर तंत्र विकसित करण्यात आले आहे. परंतु अजुनही अनेक शेतकरी या पारंपारीक पद्धतीचाच अवलंब करतांना दिसत आहेत. 

राब भाजणीचे दुष्परिणाम 
राब केल्याने / शेतजमीन भाजल्याने तेथिल जमीनीतल शेतीसाठी उपयुक्त सुक्ष्मजीव नष्ट होतात परिणामी शेतीस पोषण व सेंद्रिय घटक मिळत नाही. तसेच राब भाजण्यासाठी झाडांची तोड होते. प्रदुषण वाढते परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडते. शेतकर्यांचा पैसा व श्रम अधिक लागतो. 

सुधारीत पद्धत, चार सुत्री/चतूःसुत्री भात लागवड 
सुत्र - 1 भातपिकाच्या अवशेषांच्या फेरवापर 
सुत्र - 2 गिरीपुष्पाचा वापर 
सुत्र - 3 नियंत्रित लागवड 
सुत्र - 4 युरिया ब्रिकेटचा वापर 

चार सुत्री/चतूःसुत्रीचे भात शेतीचे फायदे
हे तंत्रज्ञान सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम, एकुण लागवडीच्या (बी, मजूर व खत यांचा) खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती निश्चितपणे फायदेशिर करणारे आहे. छोटा शेतकरी खरीप / उन्हाळी हंगामात भाताचे सुधारित वाण वापरुन सरासरी 40 क्विंटल प्रती हेक्टर व संकरित भाताचे वाण वापरुन सरासरी 60 क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन घेऊ शकतो. असे तज्ञांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO चे माजी शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर जासूसी प्रकरण

SCROLL FOR NEXT