अ‍ॅग्रो

सोलापुरात कांद्याला उठाव, दरही टिकून 

सुदर्शन सुतार

सोलापूर -  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याला चांगला उठाव मिळाला. किंचित चढ-उतार वगळता दर 'जैसे थे' राहिले. कांद्याला सर्वाधिक १६०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवकही कमीच होत आहे. रोज जेमतेम २० ते ४० गाड्या आवक झाली. आवक कमी असली, तरी मागणीही चांगली राहिली. त्यामुळे दर काहीसे स्थिर राहिले. कांद्याची सगळी आवक स्थानिक भागासह बाहेरील जिल्ह्यातून राहिली. आवक आणि मागणीतील ही तफावतच दरातील स्थिरता टिकून राहण्यास पूरक ठरते आहे. कांद्याला प्रतिक्विंटल किमान २०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि सर्वाधिक १६०० रुपये इतका दर मिळाला.

फळभाज्यांच्या दरातही काहीशी सुधारणा राहिली. त्यातही टोमॅटो, वांग्याला चांगला उठाव मिळाला. त्यांची आवक ही रोज ५० ते २०० क्विंटलपर्यंत राहिली. टोमॅटोला प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये आणि वांग्याला प्रतिक्विंटलला १५०० ते ३५०० रुपये, असा दर राहिला. हिरवी मिरची, ढोबळी मिरचीचे दरही टिकून राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला २००० ते ४००० रुपये, ढोबळी मिरचीला १८०० ते २२०० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्याच्या दरात मात्र चढ-उतार झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT