अ‍ॅग्रो

बेदाण्याच्या दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांनी वाढ

सकाळवृत्तसेवा

सांगली - यंदा बेदाण्याच्या दरातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यंदाचा हंगाम १५ मेपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. गेल्या तीन वर्षापेक्षा यंदाच्या हंगामात बेदाण्याच्या दरात २५ ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. बेदाण्याच्या दरात अजून वाढ होण्याची शक्‍यता बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. तसेच पिवळ्या बेदाण्याबरोबरच काळ्या बेदाण्यालाही परदेशात मागणी वाढल्याने विक्रमी निर्यात झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात बेदाण्याचे उत्पादन घेत आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांत बेदाण्याला अपेक्षित दर मिळाला नसल्याने बेदाणा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा मात्र हिरव्या, पिवळ्या बेदाण्यास चांगला दर मिळत आहे. विशेष म्हणजे देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच परदेशातही बेदाण्यास चांगली मागणी आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

आखाती देशात इराणमधून येणाऱ्या बेदाण्याची आवक घटली असल्याची माहिती तासगाव बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. याचा फायदा राज्यातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. राज्यातील बेदाण्याचे उत्पादन पाहता दरवर्षी सुमारे १० हजार टन उत्पादन वाढते किंवा घटले जाते असे चित्र पहावयास मिळते आहे. मात्र सन २०१६-१७ मध्ये १ लाख ८० हजार टन इतक्‍या बेदाण्याचे उत्पादन झाले होते. परंतु गतवर्षी बेदाण्याच्या उत्पादनात सुमारे २० हजार टनाने उत्पादन कमी झाले. बेदाण्याचे उत्पादन जरी कमी झाले असले तरी, नोटाबंदी आणि त्यानंतर बेदाण्यावर लागू करण्यात आलेला जीएसटी कर प्रमाणालीमुळे बेदाण्याच्या दरात वाढ झाली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला होता. बेदाण्याच्या चालू हंगामात बेदाण्याच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घटीची शक्‍यता आहे. दरम्यानच्या काळात बेदाण्याची परदेशासह देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढली आहे. यामुळे बेदाण्याच्या दरात वाढ झाली असून पुढील काळात बेदाण्याच्या दरात वाढ निश्‍चित असल्याचे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

बेदाण्याचा तुलनामत्क  दर आढावा
गतवर्षीचा दर (प्रतिकिलो)
हिरवा बेदाणा    १०० ते १६०
पिवळा बेदाणा    १०० ते १४०
काळा बेदाणा    ३५ ते ६५

चालू वर्षातील दर (प्रतिकिलो)
हिरवा बेदाणा    १३५ ते २०५
पिवळा बेदाणा    १५० ते १९०
काळा बेदाणा    ५५ ते ९०

राज्यातील बेदाण्याचे उत्पादन
वर्ष    बेदाणा उत्पादन (टन)
२०१३-१४    १ लाख ३० हजार
२०१४-१५    १ लाख ८० हजार
२०१५-१६    १ लाख ७० हजार
२०१६-१७.    १ लाख ८० हजार
२०१७-१८    १ लाख ६० हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT