IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

IPL 2024 LSG vs KKR Scorecard Update: आयपीएलच्या 54 व्या सामना कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध एकाना स्टेडियमवर दणदणीत विजय मिळवत पाँइंट्स टेबलमध्येही अव्वल क्रमांक मिळवला.
KKR | IPL 2024
KKR | IPL 2024Sakal

Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders:

आयपीएल 2024 मधील 54 वा सामना रविवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात एकाना स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात कोलकाताने 98 धावांनी विजय मिळवला. हा कोलकाताचा 11 सामन्यांमधील हा 8 वा विजय ठरला. त्यामुळे त्यांनी आता राजस्थान रॉयल्सला मागे टाकत पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे.

मात्र लखनौला मोठा धक्का बसला आहे. या मोठ्या पराभवामुळे त्यांना पाँइंट्स टेबलमधील पहिल्या चारमधून बाहेर पडावे लागले आहे. लखनौ आता पाचव्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांनी 11 सामन्यांमध्ये 6 विजय आणि 5 पराभव स्विकारले आहेत.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 235 केल्या. त्यामुळे लखनौसमोर विजयासाठी 236 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौला 16.1 षटकात सर्वबाद 137 धावाच करता आल्या.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

लखनौने 9 वी विकेट युधवीर सिंगच्या रुपाच 16 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर गमावली. त्याला 7 धावांवर चक्रवर्तीने रसेलच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर हर्षित राणाने 17 व्या षटकात रवी बिश्नोईला 2 धावांवर पायचीत करत लखनौचा डाव संपवला. लखनौला 16.1 षटकात सर्वबाद 137 धावाच करता आल्या.

कोलकाताकडून हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच आंद्रे रसेलने 2 विकेट्स घेतल्या, तर मिचेल स्टार्क आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: चक्रवर्तीने अ‍ॅश्टन टर्नरला, तर हर्षितने कृणालला केलं आऊट

बडोनी बाद झाल्यानंतर अ‍ॅश्टन टर्नरने आक्रमक खेळ केला होता. त्याने 14 व्या षटकात दोन षटकार मारले होते. परंतु, याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर टर्नर दुर्दैवीरित्या बाद झाला. त्याने मारलेला चेंडू त्याच्या बुटांवरून उडून गोलंदाजी करणाऱ्या चक्रवर्तीने पकडला. त्यामुळे त्याला 9 चेंडूत 16 धावा करून बाद व्हावे लागले.

त्यानंतर हर्षित राणाने 15 व्या षटकात कृणाल पांड्याला 5 धावांवर बाद केलं. कृणालचा झेल यष्टीरक्षक सॉल्टने पकडला.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: आयुष बडोनीला सुनील नारायणने धाडले माघारी

लखनौने सहावी विकेट आयुष बडोनीच्या रुपात गमावली. त्याला 13 व्या षटकात सुनील नारायणने 15 धावांवर बाद केले. त्याचा झेल लाँग ऑफला मिचेल स्टार्कने पकडला.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

लखनौने चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या षटकात मोठ्या विकेट्स गमावल्या. रसेलने आक्रमक खेळणाऱ्या मार्कस स्टॉयनिसला 10 व्या षटकात बाद केले. त्याचा झेल हर्षित राणाने घेतला.

त्यानंतर 12 व्या षटकात रसेलनेच धोकादायक ठरू शकणाऱ्या निकोलस पूरनला यष्टीरक्षक फिल सॉल्टकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे पूरनही 8 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. स्टॉयनिसने 21 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 36 धावा केल्या. त्यामुळे 12 षटकांच्या आतच लखनौने 5 विकेट्स गमावल्या आहेत.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

केएल राहुल बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला दीपक हुड्डा स्वस्तात बाद झाला. त्याला 9 व्या षटकात वरुण चर्कवर्तीने पायचीत पकडले. त्यामुळे तो 3 चेंडूत 5 धावा करून माघारी परतला.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

अर्शिन कुलकर्णीची विकेट लवकर गमावल्यानंतर लखनौचा डाव कर्णधार केएल राहुल आणि मार्कस स्टॉयनिस यांनी सांभाळला होता. त्यांनी 50 धावांची अर्धशतकी भागीदारीही केली. मात्र त्यांची भागीदारी हर्षित राणाने केएल राहुलला 8 व्या षटकात बाद करत तोडली. केएल राहुलचा झेलही रमनदीपने घेतला. केएल राहुल 21 चेंडूत 25 धावा करून बाद झाला.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

कोलकाताने दिलेल्या 236 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी लखनौकडून कर्णधार केएल राहुलसह सलामीला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अर्शिन कुलकर्णी उतरला. त्यांनी सुरुवात चांगली केली होती.

परंतु, दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शिन कुलकर्णीला मिचेल स्टार्कने बाद केले. स्टार्कने टाकलेल्या चेंडूवर अर्शिनने मोठा फटका खळण्याचा प्रयत्न केला, परंतु, कव्हरच्या क्षेत्रातून पळत येत रमनदीपने सूर मारत शानदार झेल घेतला. त्यामुळे अर्शिनला 7 चेंडूत 9 धावा करून माघारी परतावे लागले.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

अखेरच्या षटकात यश ठाकूरने तिसऱ्या चेंडूवर कर्णधार श्रेयस अय्यरला 23 धावांवर बाद केले. मात्र, अखेरच्या दोन चेंडूवर रमनदीप सिंगने चौकार आणि षटकार ठोकत कोलकाताला 20 षटकात 6 बाद 235 धावांपर्यंत पोहचवले.

त्यामुळे आता विजयासाठी लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य आहे. कोलकाताकडून अखेरीस रमनदीप 6 चेंडूत 25 धावांवर नाबाद राहिला, तर वेंकटेश अय्यर 1 धावेवर नाबाद राहिला.

गोलंदाजीत लखनौकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि युधवीर सिंग यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

रघुवंशी बाद झाल्यानंतर कोलकाताचा डाव कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंग सांभाळत होते. परंतु, रिंकूला 18 व्या षटकाच नवीन उल हकने 16 धावांवर माघारी धाडले. त्याचा झेल मार्कस स्टॉयनिसने घेतला. तो कोलकाताच्या 5 विकेटच्या रुपात बाद झाला. 18 षटकात कोलकाताने 5 बाद 200 धावा केल्या.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रघुवंशीचा अडथळा युधवीर सिंगने केला दूर

कोलकाताची एक बाजू भक्कमपणे सांभाळलेल्या अंगक्रिश रघुवंशीला 16 व्या षटकात युधवीर सिंगने माघारी धाडले. त्याचा झेल केएल राहुलने घेतला. त्याने 26 चेंडूत 32 धावांची खेळी केली.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

नारायण बाद झाल्यानंतर आंद्रे रसेल रघुवंशीबरोबर डाव पुढे नेत होता. परंतु, त्याला नवीन-उल-हकने 15 व्या षटकात बाद केले. रसेलचा अफलातून झेल बदली क्षेत्ररक्षक कृष्णप्पा गॉथमने पळत येत घेतला. त्यामुळे रसेलला 12 धावांवर माघारी परतावे लागले.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

अर्धशतक केल्यानंतरही सुनील नारायण आक्रमक खेळत होता. त्याने अंगक्रिश रघुवंशीबरोबर अर्धशतकी भागीदारीही केली. मात्र अखेर त्यांची जोडी 12 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रवी बिश्नोईने तोडली. त्याने नारायणला देवदत्त पडिक्कलच्या हातून झेलबाद केले.

नारायण 39 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांसह 81 धावा करून बाद झाला. त्याने रघुवंशीबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागादारी केली.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

फिल सॉल्ट बाद झाल्यानंतरही सुनील नारायणनने अंगक्रिश रघुवंशीला साथीला घेत कोलकाताचा डाव पुढे नेला आणि 10 षटकांच्या आतच संघाला 100 धावांचा टप्पाही पार करून दिला. इतकेच नाही, तर त्याने 27 चेंडूत त्याचे अर्धशतकही पूर्ण केले.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून फिल सॉल्ट आणि सुनील नारायण यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनीही सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्विकारला होता. त्यामुळे त्यांनी 4 षटकातच 55 धावांचा टप्पा पार केलेला.

परंतु, पाचव्या षटकात नवीन-उल-हकने टाकलेला लेग कटर खेळताना सॉल्टने नियंत्रण गमावले आणि तो यष्टीरक्षक केएल राहुलकडे झेल देत बाद झाला. त्याने 14 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 32 धावा केल्या.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: जाणून घ्या लखनौ - कोलकाता संघांची प्लेइंग-11

कोलकाता नाईट रायडर्स: फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नारायण, आंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - अनुकुल रॉय, मनीष पांडे, श्रीकर भारत, शेरफेन रदरफोर्ड, वैभव अरोरा

लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुड्डा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, यश ठाकूर

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - अर्शिन कुलकर्णी, मणिमरण सिद्धार्थ, कृष्णप्पा गॉथम, युधवीर सिंग, देवदत्त पडिक्कल

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल

आयपीएल 2024 मधील 54 वा सामना रविवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात एकाना स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी कोलकाता संघाने प्लेइंग-11 मध्ये एकही बदल केलेला नाही. परंतु, लखनौ संघाने दुखापतग्रस्त मयंक यादवच्या जागेवर यश ठाकूरला संधी दिली आहे.

Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रविवारी डबल हेडर म्हणजेच दोन सामने खेळवले जात आहेत. रविवारचा दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात होणार आहे.

लखनौच्या घरच्या मैदानात भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. हा आयीएलच्या 17 व्या हंगामातील 54 वा सामना असून संध्याकाळी 7.30 वाजता चालू होणार आहे.

दोन्ही संघांचा हा यंदाच्या हंगामातील प्रत्येकी 11 वा सामना आहे. दोन्ही संघांनी त्यांच्या शेवटच्या सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे हीच विजयी लय रविवारी होणाऱ्या सामन्यातही कायम ठेवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.

आयपीएल 2024 मध्ये लखनौने आत्तापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांतील 6 सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत, तर 4 सामने पराभूत झाले आहेत. तसेच कोलकाताने 10 सामन्यांमधील 7 सामने जिंकले आहेत आणि 3 सामने पराभूत झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com