अ‍ॅग्रो

उन्हाळी सोयाबीनला पाणी देण्याची लगबग

मंठा तालुक्यातील चित्र, चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

मंठा : तालुक्यात यंदा उन्हाळी सोयाबीनचे पीक बहरात आहे. सध्या शेतकऱ्यांची पिकांस पाणी देण्याची लगबग सुरू आहे. यंदा सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.सोयाबीनच्या पिकाकरिता खर्च व मेहनत कमी लागत असल्याने तालुक्यात खरिपाच्या पेरणीत कपाशीचे क्षेत्र घटून सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढले आहे. या वर्षी खरिपाच्या पिकात सर्वाधिक ३२ हजार ८९६ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली होती.

पावसाची अनियमितता व अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तरी देखील थोड्याफार प्रमाणात सोयाबीनचे पिक शेतकऱ्याच्या पदरात पडले तसेच सोयाबीनला बाजारात भाव देखील चांगला मिळत आहे.यावर्षी पाऊस भरपूर पडल्याने विहिरीच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. ठिकठिकाणी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. याबरोबरच ठिबक सिंचन, तुषार सिंचन यामुळे पाण्याची बचत होऊन पिकाच्या मोठ्या क्षेत्रात पाणी देता येते. तसेच अनेक शेतकऱ्याकडे ठिबक व तुषार सिंचन असल्याने जास्तीचा खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे यावर्षी रब्बीच्या पिकात सोयाबीन पिकाची वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरिपात सोयाबीनचे पिक घेतले होते.

त्याच शेतात नंतर उन्हाळी सोयाबीन पेरणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यात उन्हाळी सोयाबीनचे पिक बहारदार आहे. शेतकरी दिवस-रात्र उन्हाळी सोयाबीन पिकाची वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी सज्ज आहेत. शिवाय सोयाबीन पिकास पाणी देण्याची लगबग करीत आहे. उन्हाळी सोयाबीन बहारदार असून भरपूर उत्पादन मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. खरिपाच्या पेरणीच्या वेळी सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. अनेक शेतकऱ्याना इतर जिल्ह्यातून जास्त भावाने सोयाबीनचे बियाणे खरेदी करावे लागले होते. आता उन्हाळी सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार बियाणे मिळेल व सोयाबीन विक्रीतून आर्थिक हातभार देखील लागेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT