88.33 percent water storage in Mula Dam 
अहिल्यानगर

‘मुळा’ची वाटचाल ओव्हर-फ्लोकडे

भंडारदऱ्यातून विसर्ग सुरूच; पावसाचा जोर कायम; अंब्रेला फॉलला पर्यटकांची पसंती

सकाळ वृत्तसेवा

राहुरी - मुळा धरण आज शनिवारी (ता. १३) सायंकाळी सहा वाजता ८८.३३ टक्के भरले. धरणाची वाटचाल ९० टक्‍क्यांकडे सुरू असून, विसर्ग सोडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. सध्या ९ हजार ५४१ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून, लाभक्षेत्रात विसर्ग सुरू आहे.

मुळा धरणात पाणीसाठा २२ हजार ९६७ दशलक्ष घनफूट (क्षमता २६ हजार) झाला आहे. लहीत खुर्द (कोतुळ) येथे मुळा नदीपात्रातून ९,५४१ क्यूसेकने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे, १५ ऑगस्ट रोजी धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. १६ ऑगस्ट रोजी पाणीसाठा २५ हजार ५०० दशलक्ष घनफूट स्थिर ठेवून नव्याने जमा होणारे पाणी धरणातून नदीपात्रात सोडले जाणार आहे. धरण परिचालन सूचीनुसार १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान धरण पूर्ण क्षमतेने २६ हजार दशलक्ष घनफूट भरले जाते. यंदा सलग चौथ्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरणार आहे.

भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दी

अकोले : भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, घाटघर येथे २०५ मिलिमीटर म्हणजे आठ इंच पाऊस झाल्याने जलाशयात पाण्याची आवक वेगाने वाढत आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता जलाशयात १० हजार ६६७ दशलक्ष घनफूट साठा होता. धरणातून चार हजार ७२६ क्यूसेकने विसर्ग सुरू असून, अंब्रेला फॉल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. वाकी जलाशयातून ७९० क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याने रंधा धबधबा परिसर जलमय झाला आहे. शनिवारी-रविवारी सुटी असल्याने पर्यटकांनी या परिसरात मोठी गर्दी केली आहे. राजूर पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरू करून गर्दीचे नियोजन केले आहे. मोठ्या प्रमाणात वारा व पाऊस असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. धरणात नवीन पाण्याची आवक वाढत आहे. उद्या रविवारी (ता. १४) सायंकाळी सहा वाजेपर्यंत एक हजार दशलक्ष घनफुटांनी धरण साठा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी (ता. १५) धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल.

- सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT