Agastya factory made Diwali sweet for farmers and employees
Agastya factory made Diwali sweet for farmers and employees 
अहमदनगर

अगस्ती कारखान्याने शेतकरी, कर्मचाऱ्यांची दिवाळी केली गोड

शांताराम काळे

अकोले - देशात व राज्यात सध्या कोव्हीड-19 या महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला असतांना शेतक-यांचे मालाला योग्य तो भाव मिळत नसल्यामुळे शेतक-यांची आर्थिक परिस्थितीत अत्यंत खालावत चालली आहे, अशा परिस्थितीत अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रातील ऊस ऊत्पादक शेतक-यांना दिपावलीसाठी १२५ रूपये प्रति टनाप्रमाणे 285.00 लाख पेमेंट लवकरच शेतक-यांचे बँकेचे खात्यावर वर्ग करत आहे.

कारखान्याचे कामगारांना दिपावलीसाठी २० टक्के बोनस व एक महिन्याचे सानुग्रह अनुदान तसेच रोजंदारी कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस असे एकुण 450.00 लाख अदा करत आहे. कारखान्याने दीपावली सणासाठी ऊस ऊत्पादक शेतक-यांना सवलतीचे दरात साखर वाटप करावयाचे धोरण घेतले आहे.

शेतक-यांचे आलेल्या ऊसास प्रति मे.टन एक किलो साखर दर प्रति किलो वीस रूपयांप्रमाणे सवलतीचे दराने तसेच 50 किलो कटटा पुर्ण करणेसाठी कमी पडणारी साखर प्रति किलो ३४ रूपये दराने ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत कारखाना कार्यस्थळावर गटवार साखर वाटप होणार आहे.

माजी मंत्री व अगस्ति साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मा.मधुकरराव पिचड, कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे चेअरमन मा.सिताराम पाटील गायकर, मा.आ.व कारखान्याचे संचालक मा.वैभवराव पिचड तसेच कारखान्याचे सर्व संचालक मंडळाने योग्य ते नियोजन करुन कारखाना सुरळीतपणे चालविणेसाठी शेतकरी व कामगार यांना बरोबर घेऊन कारखान्याची वाटचाल अत्यंत चांगल्या प्रकारे चालु ठेवलेली आहे.

कारखान्याने सध्याचे कोव्हीड-19 चे संकट काळात सामाजिक बांधीलकी जपत अकोले येथे 100 बेडचे कोव्हीड सेंटर सुरु केलेले असून, त्यामध्ये कोव्हीड रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत. त्या ठिकाणी योग्य तो वैद्यकिय सुविधा व सुरक्षा स्टाफ यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

ऍ़डमिट असणा-या रुग्णांसाठी चहा, नाष्टा व जेवण इ.सर्व आवश्यक त्या सुविधा कारखान्याने उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यातील रुग्णांना अकोले येथेच त्यांचेवर कोव्हीडचे ऊपचार होत असल्याने त्याचा मोठा फायदा रुग्णांना होत आहे. त्याबद्यल तालुक्यातून कारखान्याचे व्यवस्थापना विषयी समाधान व्यक्त होत आहे. कारखान्याने केलेल्या या उपक्रमाचे सर्वचस्तरातून कौतूक होत आहे. अशी माहिती अगस्ति कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.बी.एस.घुले यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT