audio clip viral esakal
अहिल्यानगर

Ahmednagar : नेवासेत पुन्हा ‘ऑडिओ बॉम्ब’

वाहतूक पोलिस-प्रवासी वाहतूक वाहन चालकांचे संभाषण व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

नेवासे : नेवासे पोलिस आणि खळबळ उडवणारी ऑडिओ क्लिप आता हे समीकरणच झाले असून दोन महिन्यानंतर पुन्हा आज मंगळवार (ता. पाच) ला सायंकाळी वाहतूक शाखेचा एक पोलिस व प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यक्तीच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पुन्हा नेवासे पोलिस चर्चेत आले आहे.

नेवासे पोलिसांची सर्वप्रथम अप्पर पोलिस अधीक्षक-एका पोलिस कॉन्स्टेबलच्या संभाषण, त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे (ता. ११) ऑगस्टला पोलिस निरीक्षक व वाळू तस्कर, त्यानंतर दोनच दिवसांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल व वाळू तस्कर यांचा मध्यस्थी या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचे प्रकरणांची चौकशी सुरू असतानाच आज वाहतूक शाखेचा पोलिस कर्मचारी व प्रवासी वाहतूक करणाऱ्यांमध्ये झालेल्या संभाषणाची पोलिसांची चौथी ऑडिओ क्लिप आज व्हायरल झाली आहे.

दरम्यान, या कथित क्लिपमध्ये परवानाधारक व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविषयी वादाची चर्चा आहे. यात स्थानिक पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांसह अनेक व्यक्तीच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपवर पोलिस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

ही ऑडिओ क्लिप मी अजून ऐकली नाही. ऐकल्या यानंतर योग्य तपास करून पुढील कारवाई करू.

- बाजीराव पोवार, पोलिस निरीक्षक, नेवासे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

SCROLL FOR NEXT