

Santosh Pandit Garlands Pune Pothole After Jail Release
Esakal
पुण्यातील युट्यूबर आणि सामाजिक प्रश्न सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून मांडणारे संतोष पंडित यांना आक्षेपार्ह भाषा वापरल्या प्रकरणी अटक झाली होती. १४ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर बाहेर आलेल्या संतोष पंडित यांनी पुन्हा एकदा व्हिडीओच्या माध्यमातून रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर जोरदार टीका केलीय. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पहिला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी पुण्यातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावर महापालिका प्रशासनाला सवाल केले आहेत.