plastic ban
plastic ban 
अहमदनगर

Ahmednagar : ५०० किलो प्लॅस्टिक कॅरिबॅग जप्त

राजेश नागरे

अहमदनगर : केंद्र व राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने महापालिका कर्मचाऱ्यांसह शहरातील दुकानांमध्ये आज (ता. २८) संयुक्तपणे छापे घातले. या कारवाईत तब्बल ५०० किलो कॅरिबॅग जप्त करून सहा व्यावसायिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा (कॅरिबॅग) सर्रास वापर होत आहे. त्यामुळे पर्यावरणासह आरोग्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी करिबॅगचा खच पडलेला दिसतो. एवढेच नाही, तर घरोघरी मोठ्या प्रमाणात कॅरिबॅगचा वापर केला जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारने १ जुलै २०२२ पासून प्लॅस्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्लॅस्टिक वस्तूंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री आणि वापर यांवर बंदी आहे.

तरी देखील शहरात कॅरिबॅगचा वापर होत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने आज (बुधवारी) गंजबाजार, मोची गल्ली, कापडबाजार आदी ठिकाणी कारवाई करून ५०० किलो प्लॅस्टिकच्या कॅरिबॅग जप्त केल्या. त्याचबरोबर सहा जणांना प्रत्येकी पाच हजार, असा एकूण ३० हजार रुपयांचा दंड केला. केंद्राचे चंद्रकांत शिंदे, क्षेत्रीय अधिकारी रविराज पाटील, प्रमोद डोके, महापालिकेचे प्रशांत रामदीन, सुरेश वाघ, भरत सारवान, हृषीकेश वाल्मीक, हृषीकेश भालेराव, संदीप चव्हाण, राजेंद्र सामल आदींनी ही कारवाई केली.

यावर आहे बंदी

७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्या, प्लास्टिक काड्यांसह कानकोरणी, फुग्यांच्या कांड्या, प्लॅस्टिकचे झेंडे, कँडी, आइस्क्रीम कांड्या, सजावटीसाठी लागणारे पॉलिस्टिरीन (थर्माकोल), प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी, काटे-चमचे चाकू, स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या, (स्टिरर्स), मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटच्या पाकिटाभोवतीची फिल्म, पीव्हीसी बॅनर (१०० मायक्रॉनपेक्षा कमी).

एकल वापराचे प्लॅस्टिक वापरण्यास बंदी आहे. व्यावसायिकांनी ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग व इतर प्लॅस्टिकची विक्री करू नये. या प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. त्याचबरोबर कॅन्सरसारख्या आजारांनाही तोंड द्यावे लागते. नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर तत्काळ बंद करावा.

- रविराज पाटील, क्षेत्रीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT