ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : ‘एमपीडीए’ कारवाईत नगर टॉप; वाळूतस्करांसह धोकादायक व्यक्तींच्या विरूद्ध ‘एमपीडीए

जिल्ह्यात वाळूतस्करीतून अनेक गुन्हे घडले आहेत. महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - वाळूतस्करांसह धोकादायक व्यक्तींच्या विरूद्ध ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई करण्यात अहमदनगर पोलिस राज्यात आघाडीवर आहे. सराईत गुन्हेगारांच्या विरूद्ध प्रस्ताव तयार करून ते जिल्ह्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. मंजुरी मिळताच संबंधित गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.

जिल्ह्यात वाळूतस्करीतून अनेक गुन्हे घडले आहेत. महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाने खंबीर भूमिका घेतली आहे. वाळूतस्कर आणि धोकादायक व्यक्तींच्या विरूद्ध कारवाईचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करून ते जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

भिंगार आणि कोतवाली पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी नीलेश सुनील पेंडुलकर (वय २७, रा. पाटील गल्ली, भिंगार) याच्याविरूद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिनकर मुंडे यांनी तयार केला. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे पोलिस अधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला.

सालीमठ यांनी प्रस्तावास मंजुरी देवून आरोपी पेंडुलकर याला स्थानबद्ध करण्याचे आलेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाला कारवाईच्या सूचना देत आरोपी पेंडुलकर याला ताब्यात घेतले. भिंगार कॅम्प पोलिसांच्या सहकार्याने आरोपीची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, रविंद्र पांडे, राम माळी, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डीले, फुरकान शेख, शिवाजी ढाकणे, कैलास सोनार आदींनी ही कारवाई केली.

नाशिक कारागृहात रवानगी

मागील महिन्यात जामखेड, श्रीगोंदा आणि लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सागर सुभाष गवसणे उर्फ सागर मराठा, सुभाष कोंडीबा चौधरी व कुंदन मार्कस आरवंडे या तीन सराईत आरोपींच्या विरूद्ध ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेने त्यांना गजाआड करून त्यांची रवानगी नाशिक कारागृहात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT