अहिल्यानगर

Ahmednagar: कट्टा विकायला आले अन्‌ जाळ्यात अडकले! पोलिसांकडून दोघांना अटक, मुद्देमाल जप्त

गावठी कट्टे व जिवंत काडतुसांची खुलेआम विक्री करणाऱ्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. कारवाईत ६२ हजार रूपये किमतीचे दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त केली.

सकाळ डिजिटल टीम

Local Made Guns Sale in Ahmednagar: गावठी कट्टे व जिवंत काडतुसांची खुलेआम विक्री करणाऱ्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. कारवाईत ६२ हजार रूपये किमतीचे दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त केली. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील शेंडी बायपास व नागरदेवळे शिवारात एलसीबीने कारवाई केली.

गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी काही जण शेंडी व नागरदेवळे येथे येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने दोन्ही ठिकाणी सापळा लावला. शेंडी बायपास परिसरातून पोलिसांनी विकास सुधाकर सरोदे (वय २३, रा. गुंजाळे, ता. राहुरी, जि. अहमदनगर) याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन काडतुसे जप्त केली. विकास सरोदे याचा साथीदार लखन सुधाकर सरोदे पळून गेला. दुसरी कारवाई नागरदेवळे शिवारातील वारूळवाडी रस्त्यावर करण्यात आली. ठकन ऊर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट (वय ३३, रा. मोरे चिंचोरा, ता. नेवासा) याला ताब्यात घेतले. आल्हाटचा साथीदार भैया शेख हा घटनास्थळावरून पळून गेला. (Latest Marathi News)

आल्हाट सराईत गुन्हेगार

ठकन आल्हाट हा सराईत गुन्हेगारआहे. अहमदनगर व पुणे जिल्ह्यात दरोडा, खुनाचा प्रयत्न, अत्याचार, जबरी चोरी, अवैध शस्त्रे बाळगणे, दुखापत असे ९ गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT