ahmednagar
ahmednagar sakal
अहमदनगर

Ahmednagar : जिल्ह्यात डेंगीचा प्रादुर्भाव वाढला

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्ह्यात जानेवारी ते २५ सप्टेंबरपर्यंत डेंगीचे ६९ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. ही वाढ नगर शहरामध्ये सर्वाधिक झालेली आहे. त्यामुळे शहराचे वातावरण चिंताजनक आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून, गवत मोठ्या प्रमाणात वाढल्याने डासांची संख्या वाढली आहे. सध्या जिल्ह्यात डेंगीचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी सध्या औषधफवारणीचे काम सुरू आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ग्रामीण भागात ३६ व महापालिका हद्दीत ३३ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते जुलैदरम्यान १२ रुग्ण आढळून आले होते. यामध्ये ग्रामीण भागात सात व महापालिका हद्दीत पाच रुग्ण आढळले. ऑगस्ट ते आजअखेर जिल्ह्यात ५७ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन महिन्यांतील आकडा चिंताजनक आहे.

ऑगस्टमध्ये ग्रामीण भागात २३, महापालिका हद्दीत १७, सप्टेंबरमध्ये ग्रामीण भागात ६ व महापालिका हद्दीत रुग्ण वाढलेले आहेत. महापालिका हद्दीत जानेवारी ते जुलैदरम्यान फक्त पाचच रुग्ण आढळून आले होते. मात्र ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यांत २८ रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे शहरात डेंगीने हातपाय पसरवले असल्याचे चित्र आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT