IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

IPL 2024 MI vs SRH Scorecard Update: आयपीएल 2024 स्पर्धेतील 55 व्या सामन्या मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर दणदणीत विजय मिळवला.
Suryakumar Yadav - Tilak Varma | Mumbai Indians
Suryakumar Yadav - Tilak Varma | Mumbai IndiansSakal

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad:

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 55 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 7 विकेट्सने विजय मिळवला.

हा मुंबईचा 12 सामन्यांमधील चौथा विजय ठरला. त्यामुळे आता मुंबई पाँइंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावरून 9 व्या क्रमांकावर आले आहेत. तसेच हैदराबाद चौथ्या क्रमांकावर कायम राहिले असले, तरी या पराभवाचा परिणाम त्यांच्या नेट रन रेटवर झाला आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 173 धावा केल्या. त्यामुळे मुंबईसमोर विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग मुंबईने 17.2 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

अर्धशतक केल्यानंतरही सूर्यकुमारने आपली लय कायम ठेवली आणि शतक ठोकलं. त्याने 51 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकारांसह 102 धावांची नाबाद खेळी केली.

या सामन्यात मुंबईला विजयासाठी 6 धावांची गरज असताना सूर्यकुमारने 18 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर टी नटराजनविरुद्ध खणखणीत षटकार ठोकला आणि शतक पूर्ण करण्याबरोबरच मुंबईच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले.

त्याला तिलक वर्मानेही 32 चेंडूत 37 धावांची नाबाद खेळी करत भक्कम साथ दिली. 3 बाद 31 धावा अशा स्थितीतून या दोघांनी 143 धावांची नाबाद भागीदारी करत मुंबईला 7 विकेट्सने विजय मिळवून दिला.

हैदराबादकडून भूवनेश्वर कुमार, मार्को यान्सिन आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

सुरुवातीला मोठे धक्के बसल्यानंतर मुंबईचा डाव सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी सावरला. त्यांनी मुंबईला 100 धावांचा टप्पा सहज पार करून दिला. या दरम्यान सूर्यकुमारने 30 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे आता मुंबईच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

IPL 2024 MI vs SRH Live Score: भूवीने दिला मुंबईला तिसरा दणका, नमनला केलं बाद

भूवनेश्वर कुमारने मुंबईला तिसरा धक्का दिला. त्याने पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नमन धीरला माघारी धाडले. त्याचा झेल मार्को यान्सिनने घेतला. त्यामुळे नमला शुन्यावरच माघारी परतावे लागले.

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

इशान बाद झाल्यानंतर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने मुंबईला आणखी एक मोठा धक्का दिला. त्याने तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्माला बाद केले. रोहितने मारलेल्या शॉटवर चेंडू उंच उडाला, त्यामुळे त्याचा झेल यष्टीरक्षक हेन्रिक क्लासेनने घेतला. रोहितने 4 धावा केल्या.

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

हैदराबादने दिलेल्या 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून सलामीला रोहित शर्मा आणि इशान किशन उतरले. इशानने दोन चौकारांसह आक्रमक सुरुवातही केली. मात्र, दुसऱ्या षटकात मार्को यान्सिनने त्याला मयंक अगरवालच्या हातून झेलबाद केले. इशानने 9 धावा केल्या.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

सामद बाद झाल्यानंतर मात्र हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरलेल्या सनवीन सिंगला साथीला घेत डाव पुढे नेला.

त्याने जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि सनवीरसह नाबाद 37 धावांची भागीदारी करत हैदराबादला 20 षटकात 8 बाद 173 धावांपर्यंत पोहचवले. अखेरीस कमिन्स 17 चेंडूत 35 धावांवर नाबाद राहिला, तर सनवीर 8 धावांवर नाबाद राहिला.

मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि पीयूष चावला यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर अंशुल कंभोज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

IPL 2024 MI vs SRH Live Score: अब्दुल समदनेही स्वस्तात गमावली विकेट

हैदराबादने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. त्यांची आठवी विकेट अब्दुल समदच्या रुपात गमावली. त्याला पीयुष चावलाने 3 धावांवर पायचीत केले. ही चावलाची या सामन्यातील तिसरी विकेट ठरली. त्यामुळे यंदाच्या हंगामात मुंबईकडून एका फिरकीपटूने 3 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

हार्दिकने 16 व्या षटकात हैदराबादला दुहेरी धक्का दिला. त्याने शाहबाज अहमदविरुद्ध टाकलेल्या पहिल्या चेंडूवर शाहबाजने लाँग-ऑनला शॉट मारला, पण तिथे असलेल्या सूर्यकुमार यादवने तो चेंडू झेलला. त्यामुळे शाहबाज 10 धावांवर बाद झाला.

त्यानंतर हार्दिकने पाचव्या चेंडूवर मार्को यान्सिनला 17 धावांवर त्रिफळाचीत केले. हार्दिकची ही तिसरी विकेट ठरली, तर हैदराबादने 16 षटकांपर्यंत 7 विकेट्स गमावल्या.

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

पीयूष चावलाने शानदार गोलंदाजी करताना 13 व्या षटकात हेन्रिक क्लासेनला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. त्याने क्लासेनला 2 धावांवरच त्रिफळाचीत केले. क्लासेन हैदराबादच्या 5 व्या विकेटच्या रुपात बाद झाला.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने नितीश रेड्डीला केलं बाद

हेडपाठोपाठ 12 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नितीश रेड्डीला बाद केले. नितीशचा झेल अंशुल कंभोजने घेतला. त्यामुळे नितीशला 15 चेंडूत 20 धावांवर बाद होत परत जावे लागले.

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयुष चावलाने हैदराबादला दिला मोठा दणका! धोकादायक ट्रेविस हेडला धाडलं माघारी

पाचव्या षटकात मिळालेल्या जीवदानाचा ट्रेविस हेडने चांगला फायदा उचलला होता. पण अखेर त्याचा अडथळा 11 व्या षटकात पीयूष चावलाने दूर केला. त्याने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर हेडने स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅकवर्ड स्केअरला गेला आणि तिलक वर्माने सोपा झेल घेतला. त्यामुळे हेड 30 चेंडूत 48 धावा करून माघारी परतला.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हैदराबादला दुसरा धक्का! मुंबईकडून पहिला सामना खेळणाऱ्या अंशुलने उडवला मयंक अग्रवालचा त्रिफळा

अंशुल कंभोजला हेडची विकेट मिळाली नसली तरी त्याने आठव्या षटकात हैदराबादकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या मयंक अग्रवालला बाद केले. अग्रवालला त्याने त्रिफळाचीत करत आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. अग्रवाल 5 धावांवर बाद झाला.

IPL 2024 MI vs SRH Live Score: बुमराहने दिला हैदराबादला पहिला धक्का! युवा सलामीवीर स्वस्तात बाद

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. एका बाजूने अभिषेक शर्मा संयमी खेळ करत होता, तर दुसऱ्या बाजूने ट्रेविस हेडने आक्रमण केले.

दरम्यान, पाचव्या षटकात पदार्पणवीर अंशुल कंभोजने हेडचा त्रिफळा उडवलेला, मात्र त्याचा हा चेंडू नो-बॉल ठरला. त्यामुळे हेडला जीवदान मिळाले होते. नंतर पाचव्या षटकात अखेर जसप्रीत बुमराहने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्याने अभिषेक शर्माला ११ धावांवर बाद केले. अभिषेकचा झेल यष्टीरक्षक इशान किशनने पकडला.

IPL 2024 MI vs SRH Live Score: जाणून घ्या मुंबई-हैदराबादचे प्लेइंग-11

सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को यान्सिन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - मयंक मार्कंडे, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, जयदेव उनाडकट, उमरान मलिक

मुंबई इंडियन्स: इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - नेहल वढेरा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्याने जिंकला टॉस! मुंबईकडून या खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 55 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईच्या या सामन्यातून अंशुल कंभोज पदार्पण करत आहे. तसेच या सामन्यातून हैदराबाद संघात मयंक अग्रवालचे पुनरागमन झाले आहे. त्याला हैदराबादने प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 55 वा सामना सोमवारी (6 मे) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे.

हे दोन संघ आयपीएलमध्ये 22 वेळा आमने-सामने आले आहेत. यापैकी 10 सामने हैदराबादने जिंकले आहेत, तर 12 सामने मुंबईने जिंकले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com