Ahmednagar Dharmaveer movie free premiere show for Shiv Sainiks  sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : चित्रपटातून दिघे यांचे कार्य जनतेसमोर; कदम

शिवसैनिकांसह नवकार्यकर्त्यांना प्रेरणादायी राहील असा चित्रपट

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शिवसैनिक कसा असावा, हे आनंदराव दिघे यांच्या कार्यातून दिसून येते. जनतेच्या कामांसाठी आपले आयुष्य पणाला लावून त्यांनी समाजशील नेता कसा असतो हे दाखवून दिले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आपले गुरू मानून सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येत, शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम उभे केले. जनमानसात त्यांची प्रतिमा नेहमीच उंचावलेली राहिली आहे. चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचे जीवनकार्य लोकांसमोर आल्याने त्यांच्या कार्याची प्रचिती येत आहे. हा चित्रपट शिवसैनिकांसह नवकार्यकर्त्यांना प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरील ‘धर्मवीर मु.पो.ठाणे’ हा चित्रपट शिवसैनिकांसाठी मोफत प्रिमिअर शो चे आशा स्क्वेअर चित्रपटगृहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, विक्रम राठोड, पुष्पा बोरुडे, स्मिता अष्टेकर, अनिल शिंदे, संजय शेंडगे, माजी महापौर सुरेखा कदम, अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, गणेश कवडे, दत्ता जाधव आदी उपस्थित होते. सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, उपनेते (कै.) अनिल राठोड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Trade Tariff : इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिका लादणार २५ % टॅरिफ, भारतावर काय होणार परिणाम ?

Dnyanai Book : ज्ञानेश्वरीचा सुगम, पद्यमय अनुवाद ‘ज्ञानाई’ लवकरच उपलब्ध

इराणमध्ये २००० मृत्यू, ट्रम्प-नेतन्याहू मारेकरी; अमेरिकेनं ऐनवेळी बैठक रद्द केल्यानं भडकले इराणचे NSC

Gadhinglaj Deforestation : ‘काय तो डोंगर, काय ती झाडी’ ओळख पुसट; काळभैरव डोंगर उघडा-बोडका होत चालला

Nitin Gadkari: नागपूरचा सर्वांगीण विकास हेच लक्ष्‍य: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; जात-पात, धर्माचा विचार केला नाही!

SCROLL FOR NEXT