drought  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : जिल्ह्यातील २६१ गावांत दुष्काळसदृश स्थिती

खरीप पिकांची पैसेवारी ५० पेक्षा कमी

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - जिल्ह्यात या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. अकोले तालुक्याचा पश्‍चिम भाग वगळता अन्यत्र कमी पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात १ हजार ६०६ महसूल गावे आहेत. खरीप हंगामातील पिके ५८५ गावांमध्ये घेतली जात असून त्यापैकी २६१ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

जिल्ह्यात १ हजार ६०६ महसूल गावे आहेत. रब्बी हंगामातील पिके १ हजार २१ गावांमध्ये घेतली जात आहेत. ५८५ गावे हे खरीप हंगामातील पिकांसाठी ओळखली जातात. तालुकानिहाय एकूण गावे आणि कंसात खरीप पिकांची गावे याप्रमाणे ः अकोले १९१, संगमनेर १७४, कोपरगाव ७९ (१६), राहाता ६१ (२४), श्रीरामपूर ५६ (०), राहुरी ९६ (१७), नगर १२१ (५), नेवासे १२७ (१३), पाथर्डी १३७ (८०), शेवगाव ११३ (३४), पारनेर १३१ (३१), श्रीगोंदे ११५ (०), कर्जत ११८ (०), जामखेड ८७ (०) समावेश आहे.

तलाठी, कृषी सहायक आणि सरपंच यांचा समावेश असलेली संयुक्त समिती गावातील पिकांची नजरपाहणी करून अहवाल मंडलाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदारांना सादर करत असते. नजर अंदाज (प्राथमिक) अहवाल पाहणी केली आहे. त्यानुसार २६१ गावांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी आढळून आली आहे. तालुकानिहाय ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावे प्रमाणे ः अकोले ४०, संगमनेर १६४, कोपरगाव १६, राहाता २४, राहुरी १७.

सध्या केलेल्या प्राथमिक अहवालानंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत सुधारित पाहणी अहवाल सादर केला जातो. त्यानुसार पैसेवारीच्या गावांमधील गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अंतिम पैसेवारी १५ ोडिसेंबरला जाहीर होत असते. ज्या गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्या गावांना दुष्काळी गावे म्हणून जाहीर केले जाते.

माधुरी आंधळे,तहसीलदार, महसूल शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT