Belgaon road 
अहिल्यानगर

Ahmednagar : पाहुणेही विचारतात 'तो' रस्ता झाला का? बागायतदारांच्या बेलगावला रस्त्याची प्रतीक्षा

सकाळ डिजिटल टीम

मिरजगाव : लालफितीचा कारभार,प्रशासनाची डोळेझाक आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे एखाद्या गावातील नागरिकांना किती मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असेल,हे अनुभवायचे असेल तर त्यासाठी मिरजगाव-बेलगाव रस्त्याची सफर कारवी लागेल. स्त्याची दुर्दशा इतकी की, रस्त्यावर खड्डे की खड्यात रस्ता असा प्रश्न प्रवाश्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.

बेलगाव, घुमरी, पिंपरी, कानडी, निमगाव गांगर्डा अशा महत्वाच्या गावातील नागरिकांचा वावर असणारा चार किलोमीटरचा हा रस्ता, मागील पंधरा वर्षांपासून कधीच सलग दुरुस्त झाला नाही. कधी 800 मीटर तर कधी 1 किलोमीटर, तर कधी रस्त्यावर खडी तर कधी खडीवर मुरूम.

डागडुजीच्या नावाखाली फक्त वरवरची मलमपट्टी. बागायतदारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेलगावला जाणारा रस्ता खड्डेमय झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा तर लागतोच. मात्र आता या गावांना येणारे पाहुणे सुद्धा रस्ता दुरुस्त झाला काय ? असेविचारून गावात येणे टाळत आहेत.

उखडलेला रस्ता आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. आपत्तीकाळात रुगांना आणि प्रसूतीसाठी महिलांना मिरजगाव येथे उपचारासाठी आणणे देखील जिकरीचे झाले आहे. माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणसाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या खड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

आमदारांची कृपा दृष्टी पडावी

मतदार संघात सद्य स्थितीला दोन्ही आमदारांमध्ये विकासाची स्पर्धा दिसत आहे. कामे मंजूर करून घेण्यासाठी मोठ्याप्रमाणावर चढाओढ दोघांमध्ये दिसत आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाची तरी दृष्टी या रस्त्यावर पडावी आणि बेलगावकरांची रस्त्याची साडेसाती संपावी अशी माफक अपेक्षा येथील नागरिक करीत आहेत.

आमच्या गावाला जोडलेला हा रस्ता पूर्णतः खड्डेमय व अपघातांना आमंत्रण देणारा झालेला आहे. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून रस्त्यावरील पुलाचे काम सुरु झाले आहे. मात्र, रस्त्याचे काम आणखी मंजूर झालेले नाही. आमदार पवार यांच्याकडे पाठपुरावा करून तत्काळ या कामला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.

- दिपक भांबे, माजी सरपंच

रस्त्यामुळे नागरिकांना आणि विशेष करून शाळकरी मुलांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील याकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले दिसत आहे. रस्त्याचे काम तत्काळ सुरु न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने रस्त्यावरील या खड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन केले जाईल.

- प्रमोद शिंदे, उद्योजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT