In Ahmednagar, a Gram Sevak has been beaten up 
अहिल्यानगर

ग्रामसेवकाला मारहाण केल्याबद्दल सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : पाणी सोडण्याच्या वादातून नवनागापूर येथील ग्रामसेवकास मारहाण केल्याबद्दल जिल्हा व सत्र न्यायालयाने अरुण रोकडे याला एक वर्ष सक्‍तमजुरी व दीड हजार रुपये दंड केला. 

नवनागापूरचे ग्रामसेवक संजय विश्‍वनाथ मिसाळ हे 17 सप्टेंबर 2018 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय काम करीत होते. गावातील रोकडे वसाहतीला जादा पाणी सोडण्याची मागणी करीत अरुण रोकडे याने पाणीपुरवठा कर्मचाऱ्यास दमदाटी केली. नंतर स्वत:च जादा पाणी सोडले. हा प्रकार सांगण्यासाठी कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयात आला असता, त्याच्या मागे रोकडे आला. तेथे ग्रामसेवक मिसाळ यांच्याशी वाद झाला. त्यातून त्याने मिसाळ यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली.
 
मिसाळ यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने रोकडे यास वरीलप्रमाणे शिक्षा दिली. सरकार पक्षातर्फे ऍड. मोहन कुलकर्णी यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात लागताच फोन, ओमराजेंना काय सांगितलं? एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

Nagpur: ४२ वर्षीय डॉक्टरनं भुलीचं इंजेक्शन टोचून घेत आयुष्य संपवलं, ५ दिवसांपासून गेले नव्हते घरी

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जूनपर्यंत येलो अलर्ट; ३० जूनपर्यंत पडणार दमदार पाऊस

India vs SA World Cup: सुटलेल्या झेलांचा फटका : हरमनप्रीत कौर; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय कर्णधाराची निराशा

Ronaldo: रोनाल्डोच्या फॉर्मवर लक्ष; पोर्तुगालचा आज सामना

SCROLL FOR NEXT