अहिल्यानगर

Ahmednagar: पतंगोत्सवाचा मोबाईलकडून ‘गेम’! विक्री थंडावली; पुणे-नाशिकच्या व्यापाऱ्यांकडून अहमदनगरच्या पतंगांना मागणी

चार महिने चालणारी येथील पतंग उत्सवाची उलाढाल अवघ्या एका महिन्यावर आली आहे. पतंग उत्सव थंडावल्याने नगरच्या पतंगांची विक्री आता पुणे-नाशिक जिल्‍ह्यात करण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ahmednagar Kite Festival: मोबाईलच्या अतिवापराचा परिणाम नगरच्या पतंग उत्सवावरही झाला आहे. चार महिने चालणारी येथील पतंग उत्सवाची उलाढाल अवघ्या एका महिन्यावर आली आहे. पतंग उत्सव थंडावल्याने नगरच्या पतंगांची विक्री आता पुणे-नाशिक जिल्‍ह्यात करण्यात येत आहे.

मकर संक्रांतीच्या सणाला राज्यभर मोठ्या उत्साहात पतंग उत्सव साजरा केला जातो. त्यात नाशिक जिल्ह्यातील येवला शहर आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ नगर शहरात मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.

नगरमध्ये दरवर्षी सप्टेंबर महिन्यापासूनच पतंग विक्रीसाठी उपलब्ध होतात. परंतु यावर्षी दोन महिने उशिराने पतंग विक्रीसाठी उपलब्ध झाले. पतंग उडविणारा तरुण वर्ग मोबाईलमध्ये रमला आहे. (Latest Marathi News)

शाळकरी मुले देखील मोकळ्या वेळात मोबाईलवर गेम खेळताना दिसत आहेत. त्यातच पतंगांच्या किमती देखील दुपटीने वाढल्या आहेत. परिणामी पतंग उडविण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. सप्टेंबर ते जानेवारी या पाच महिन्यात पतंग विक्रीतून होणारी उलाढाल निम्म्याने कमी झाली असल्याचे पतंग विक्रेते सांगतात.

शहरात अवघे आठ ते दहा होलसेल पतंग विक्रेते आहेत. त्यांनी पतंग विक्री सुरू केली असली, तरी मागणी कमी असल्याने यंदाचा पतंगोत्सव थंडच आहे. (Latest Marathi News)

ज्यात येवल्यापाठोपाठ नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा केला जातो. परंतु काही वर्षांपासून नगरचा हा उत्सव कमी प्रमाणात साजरा होत आहे. तरुणांसह शाळकरी मुले देखील मोबाईलच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे ते पतंग उडविण्यासाठी घराबाहेर पडताना दिसत नाहीत. पतंग विक्री निम्म्याने घटली आहे.- विवेक लोटके, लोटके पतंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT