ahmednagar-municipal-corporation sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : कचरा ठेकेदारावर गुन्हा दाखल करा

जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश ः दुचाकीवरुन कचऱ्याची वाहतूक

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : अहमदनगर शहरातील कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट या ठेकेदाराची बनवेगिरी उघडकीस आली आहे. दुचाकीवरून कचऱ्याची वाहतूक केल्याची बिले महापालिका प्रशासनाला सादर करण्यात आली होती. याप्रकरणी स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते गिरीश तुकाराम जाधव यांनी दाखल केलेल्या फौजदारी पुनर्निरीक्षण याचिकेवर हा आदेश देण्यात आला आहे. जाधव यांच्यावतीने ॲड. अभिजित पुप्पाल यांनी काम पाहिले.

महानगरपालिका हद्दीतील कचऱ्याची वाहतुकीचा ठेका नामदेव भापकर (रा. खडकी, पुणे) यांनी घेतलेला आहे. कचऱ्याच्या वाहतुकीबद्दल ते महापालिका प्रशासनाला बिले सादर करतात. सामाजिक कार्यकर्ते गिरीश जाधव यांनी अहमदनगर शहरात कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या कामाची माहिती माहितीचा अधिकार वापरुन मागवली. स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या वतीने महापालिका प्रशासनाला सादर केलेल्या बिलामध्ये काही वाहने दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले. ठेकेदाराने प्रत्येक वाहनास जीपीएस सिस्टिम आवश्यक होते. परंतु, ही सिस्टिम बसवलेली नसल्याचे निष्पन्न झाले. जाधव यांनी याबाबत महापालिका प्रशासन आणि अन्य शासकीय यंत्रणांकडे तक्रार केल्या होत्या. या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाने ठेकेदाराचे बिल पूर्ण न देता एक तृतीयांश रक्कम दिली होती. जाधव यांनी याप्रकरणी स्वयंभू ट्रान्सपोर्ट आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी

यांच्या न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाने ही खाजगी फिर्याद फेटाळली. जाधव यांनी या निर्णयाविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण याचिका दाखल केली. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर सुनावणी झाली. ठेकेदाराने प्रशासनाची फसवणूक केली आहे, असा युक्तिवाद ॲड. अभिजीत पुप्पाल यांनी केला. स्वयंभु ट्रान्सपोर्टच्या संचालकांविरुद्ध बनावट कागदपत्र करणे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने ९ जून रोजी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT