ahmednagar municipal corporation found 120 years old kunbi record maratha reservation Sakal
अहिल्यानगर

Maratha Reservation : मनपात १२० वर्षे जुन्या कुणबी नोंदी आढळल्या

मोडी, देवनागरी लिपीत नोंदी; आरोग्य विभागाची शोधमोहीम

सकाळ वृत्तसेवा

- अरुण नवथर

अहमदनगर : महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात तब्बल १२० वर्षे जुन्या कुणबी नोंदी मिळून आल्या आहेत. मोडी आणि देवनागरी लिपीत असलेल्या या नोंदी तपासण्याची कार्यवाही आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. आतापर्यंत पन्नासपेक्षा अधिक नोंदी आढळून आल्या असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.

प्रशासकीय स्तरावर कुणबी नोंदी शोधण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेसह महापालिक स्तरावर देखील हे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात, तर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अहमदनगर महापालिकेत देखील कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे.

आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी गेल्या दोन दिवसांत पन्नासपेक्षा अधिक नोंदी शोधल्या आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात शहरातील जन्म-मृत्यूची नोंद होते. सुमारे सन १९०३ पासूनच्या नोंदी महापालिकेच्या दप्तरी उपलब्ध आहेत.

मोडी आणि देवनागरी या दोन लिपीमध्ये या नोंदी आहेत. आरोग्य विभागाने जन्म-मृत्यूची नोंद असलेले सर्व रजिस्टर तपासण्याचे काम हाती घेतले आहे. या रजिस्टरमध्ये तारीख, व्यक्तीचे नाव, जात आणि धर्म, तसेच राहण्याचे ठिकाण अशा पद्धतीने नोंदी करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत १९०३ सालापर्यंतचे रजिस्टर तपासण्यात आले आहेत. त्यात मोडी लिपीत पन्नासपेक्षा अधिक नोंदी मिळून आल्या आहेत. इतर नोंदी शोधण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

मोडी लिपीत सर्वाधिक नोंदी

आरोग्य विभागामार्फत जन्म-मृत्यूचे सर्व जुने रजिस्टर तपासण्यात येणार आहेत. १९०३ सालापासूनचे रजिस्टर तपासण्यास सुरुवात झाली आहे. त्यात बहुतेक नोंदी मोडी लिपीमध्ये आहेत. या नोंदी तपासून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात येणार आहे.

मराठी आणि कुणबी नोंद

जुन्या काळात शेती करणारे लोक जन्माची नोंद कुणबी म्हणून करीत होते. नगर शहरात १९०३ या कालावधीत बहुतांश लोक व्यावसायिक होते. त्यात काहींनी कुणबी, तर काहींनी मराठी अशी नोंद केल्याचे महापालिकेच्या जुन्या रजिस्टरमध्ये दिसून येते.

कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत मोडी लिपीत असलेल्या पन्नासपेक्षा अधिक कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. अजून बऱ्याच नोंदी सापडतील. या नोंदींचा अहवाल तयार करून तो जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात येईल.

-डॉ. अनिल बोरगे, आरोग्याधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT