Ahmednagar ncc sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : एनसीसीत शिस्त हवी

कर्नल गुरबक्ष ; वार्षिक प्रशिक्षण शिबिरास प्रतिसाद, ५०० छात्रांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : विद्यार्थी जीवनामध्ये व एनसीसी करिअरमध्ये शिस्तीला महत्वाचे स्थान आहे. आपण ज्या क्षेत्रात आहोत, त्याक्षेत्रामध्ये किंवा आवडत्या क्षेत्रात आपण पुढे जाण्याचा सातत्याने प्रयत्न करावा. त्याविषयी फायदे माहिती जाणून घ्यावे. ज्ञान ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. एनसीसी फायद्याविषयी आपणास संपूर्ण माहिती जाणून घेतली पाहिजे, असे मत १७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष यांनी व्यक्त केले.

सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर या बटालियनचा संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर त्रिमूर्ती नगर(ता.नेवासे) येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे. छात्र सैनिकांच्या अंगी विविध गुण निर्माण व्हावे, तसेच त्यांना प्रमाणपत्र परीक्षेला बसता यावे, प्रजासत्ताक दिन शिबिरात सहभागी होता यावे. याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात शारीरिक प्रशिक्षण, सैनिकी कवायत, नकाशे वाचन, शस्त्र प्रशिक्षण तसेच वेगवेगळ्या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर एज्युडेंट म्हणून मेजर डॉ. संजय चौधरी आहेत. शिबिरामध्ये लेफ्टनंट भरत डगळे, लेफ्टनंट सुनील फुल सांवगे, सेकंड ऑफिसर संतोष पारधी, थर्ड ऑफिसर अमोल दहातोंडे, केअरटेकर ऑफिसर पूनम गुंजाळ, सेकंड ऑफिसर अनिल देडे, थर्ड ऑफिसर संगीता मापारी हे एनसीसी अधिकारी सहभागी झाले आहेत.

या शिबिराचे ट्रेनिंग प्रशिक्षक जूनियर कमिशन अधिकारी सुभेदार रमेश चंद्रा तसेच बटालियन हवालदार मेजर राजेश कुमार, सुभेदार मेजर लोकेंदर सिव्हिलियन स्टाफ तसेच आर्मी कनिष्ठ व वरिष्ठ अधिकारी कामकाज पाहत आहेत.

छात्रांच्या कलागुणांना वाव

वार्षिक शिबिरात छात्रांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे, लष्करी प्रशिक्षण देणे, वेगवेगवेळ्या परीक्षांची तयारी करून घेणे, प्रजासत्ताक दिनापूर्वी छात्रांची निवड करणे आदी प्रक्रिया केली जाते. या शिबिरात १५० मुली, ३५० मुले आणि १० एनसीसी अधिकारी सहभागी झाले आहेत. दि. ६ ऑक्टोबर रोजी हे शिबिर सुरू झाले. त्याची सांगता १३ तारखेला होणार आहे. शिबिरात समूहगान, नृत्यासह विशेष कलागुणांना वाव दिला जातो. या शिबिरातून छात्र घडतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT