ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : लम्पीची साथ आटोक्यात ; पावसामुळे लागण वाढण्याची शक्यता

वर्षअखेर ५० हजार जनावरे बाधित झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - जिल्ह्यात आजअखेर ८२६ जनावरे बाधित आहेत. गेल्या काही दिवसांपासून लागण झालेल्या जनावरांची संख्या वाढत होती, मात्र लसीकरणामुळे साथ काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. पाऊस नसल्याने कीटकांचे प्रमाण कमी झाले होते. आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने साथ वाढण्याचा धोका आहे.

बाधितांचा आकडा वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने जनावरांचे सर्व बाजार बंद ठेवले आहेत. गेल्या वर्षी लम्पीने राज्यात कहर केला होता. त्यात नगर जिल्हा आघाडीवर होता. जनावरांचा मृत्यूदरही वाढला होता. सर्व यंत्रणा कामाला लागल्याने चार महिन्यांनंतर ही साथ आटोक्यात आली. देशी आणि दुधाळ जनावरांनाच लम्पीची लागण होत होती.

वर्षअखेर ५० हजार जनावरे बाधित झाली होती. ही पार्श्वभूमी पाहता, प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व १४ लाख जनावरांचे लसीकरण केले. गेल्या वर्षी दूधउत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. कर्जत, जामखेड, श्रीगोंदे आणि संगमनेर तालुक्यांत लम्पीने कहर केला होता. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक दुधाळ जनावरे आहेत. त्यातही गायींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

यंदा जुलै २०२३ पासून लम्पीचा पुन्हा शिरकाव झाला. त्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना केल्या. आजअखेर ८२६ जनावरे बाधित आहेत. मागील वर्षी लागण झालेल्या तालुक्यांत या वर्षी बाधित जनावरांची संख्या कमी आहे. शेवगाव, राहुरी, नेवासे, पाथर्डीत यंदा बाधित जनावरांचे आकडे मोठे आहेत. गेल्या वर्षी ४ हजार जनावरे दगावली होती. यंदा हा आकडा २६७ आहे.

शेतकऱ्यांना आवाहन

पाऊस झाल्याने कीटकांचे प्रमाण वाढते. त्यापासून प्रादुर्भावाची शक्यता बळावते. एक कीटक दिवसभरात साधारण तीन किलोमीटर प्रवास करतो. त्यामुळे पाच किलोमीटरच्या परिघात शासनामार्फत उपाययोजना केल्या जातात. साथ आटोक्यात आली असली तरी आगामी काळात काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धनचे सहायक उपायुक्त सुनील तुंबारे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT