डॉ. सुजय विखे पाटील sakal
अहिल्यानगर

Ahmednagar news : कामांची तुलना होऊ लागल्याचे 'त्यांना' दुःख ; डॉ. सुजय विखे पाटील

बाजार समिती निवडणूक प्रचारानिमित्त साकुरी गटात बैठक

सकाळ वृत्तसेवा

राहाता : मागील पंधरा वर्षांत माजी महसूलमंत्र्यांनी केली नाहीत, एवढी कामे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काही महिन्‍यांतच करुन दाखविली. यामागे त्‍यांची समाजाला न्‍याय देण्‍याचीच भूमिका राहीली. आजी-माजी महसूलमंत्र्यांच्‍या कामाची तुलना आता समाजातील प्रत्येकजण करू लागल्याने शेजारच्‍यांना त्याचे दु:ख होत असल्याची टीका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

राहाता बाजार समितीच्या निवडणूक प्रचारानिमित्ताने साकुरी गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. ‘गणेश’चे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, संचालक अ‍ॅड. रघुनाथ बोठे, संचालक विजयराव गोर्डे, बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब जेजूरकर, भाजपचे शिवाजीराव गोंदकर, अभय शेळके, साहेबराव निधाने यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, संचालक उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले की, मंत्रिपद असो अथवा नसो समाजासाठी काम करण्‍याची मंत्री विखे यांची भूमिका कायम आहे. मात्र काही जण तालुक्‍यात येऊन येथील सहकारी संस्‍थांना दृष्‍ट लावण्‍याचे काम करीत आहेत. आम्‍ही वाळूतस्कारांना पोसत नाही. दहा ठेकेदार कार्यकर्त्यांना सांभाळण्यापेक्षा सर्वसामान्यांसाठी सहाशे रुपये ब्रासने वाळू उपलब्‍ध करुन माफियांना मंत्री विखे यांनी हद्दपार केले आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने खडकेवाके येथे उभारण्‍यात येणाऱ्या १० कोटींच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्‍पात शेळ्या, मेंढ्यांचे लोकर, ब्रिडिंग, मांस निर्यात, उपपदार्थ निर्मिती होणार आहे. येत्या १५ दिवसांत त्याचे भूमिपूजन होऊन तरुणांना नोकरी मिळणार आहे. याप्रसंगी सदाफळ, अ‍ॅड. बोठे, माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने यांची भाषणे झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT