

Railway RAC System
ESakal
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेतून प्रवास करताना अनेकांना आरएसी (RAC) तिकीट असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या व्यक्तीसोबत एकच बर्थ शेअर करावा लागतो. यामुळे प्रवाशांचे हाल सहन करावे लागतात. मात्र आता रेल्वेची ही सेवा बंद होणार असल्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासन याबाबत मोठा निर्णय घेणार असून, यामुळे आरएसी तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळू शकणार आहे.