ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : नवा आरोपी अटकेत, मुख्य आरोपी फरारच

जमीन व्यवहारातून झालेल्या वादातून आरोपी सुरुंकर याने संतोष ऊर्फ लाला गायकवाड या शेतकऱ्यावर थेट गोळीबार केला.

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे - जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी जयदीप सुरुंकर हा अद्याप फरार आहे. त्याचा सहकारी सचिन ऊर्फ चिंग्या सोपान भागवत (वय २५) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.

जमीन व्यवहारातून झालेल्या वादातून आरोपी सुरुंकर याने संतोष ऊर्फ लाला गायकवाड या शेतकऱ्यावर थेट गोळीबार केला. हातातील पिस्तुलातून सहा गोळ्या खाली केल्या. हॉटेलमधून बाहेर पळाल्यानंतर पाठलाग करून गोळ्या झाडल्या गेल्या. या प्रकरणाचा तपास बेलवंडीचे उपनिरीक्षक मोहन गाजरे यांनी बारकाईने केला आहे. मुख्य आरोपी सुरुंकर याच्यासोबत असलेल्या चिंग्या भागवत याला आज अटक करण्यात आली.

त्याला पोलिसांनी निरोप दिल्यावर तो पळून गेल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि त्यातील तपासात त्याचा गुन्ह्यात संबंध असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली. या प्रकरणात अजून काही आरोपी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हल्ला पूर्वनियोजित?

मुख्य आरोपी सुरुंकर याची घरची आर्थिक स्थिती हलाखीची आहे, तरीही त्याच्याकडे पिस्तूल कोठून आले याचा शोध घेतला जात आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता का? याचाही शोध पोलिस घेत असल्याची माहिती आहे.

मोबाईल घरी; लोकेशन मिळेना

आरोपी जयदीप सुरुंकर याने हा हल्ला सराईतपणे करीत गोळ्या झाडल्यानंतर शांतपणे घटनास्थळावररून पायी चालत निघून गेला. जाताना पोलिसांना चकवा देण्यासाठी मोबाईल घरी महिलांकडे दिला. त्यामुळे त्याचे लोकेशन मिळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: मुंब्रात इमारतीचा काही भाग कोसळून दुर्घटना, एका महिलेचा मृत्यू

PKL 2025 : एकटा अयान पुणेरी पलटनवर पडला भारी! पटना पायरेट्सचा ४८-३७ ने नोंदवला स्पर्धेतील पहिला विजय

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणावरून भुजबळांची नाराजी कायम...मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार?

4 अपत्ये जन्माला घाला, करमुक्त व्हा; लोकसंख्या घटल्यानं ग्रीसच्या पंतप्रधानांची घोषणा, १६ हजार कोटींची तरतूद

वेगळं राहण्यासाठी लग्न केलंय का? प्रसाद जवादे वैतागला; पत्नी अमृता देशमुख समजूत काढत म्हणाली-

SCROLL FOR NEXT