ahmednagar sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : फिर्यादीच आरोपी; बेलवंडी पोलिसांकडून अटक; चिंभळे गोळीबार प्रकरण

या सगळे प्रकरण सुनील गायकवाड यानेच घडवून आणल्याची माहिती आरोपी सुरुंकर याने पोलिसांना दिल्याचे समजते.

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे - तालुक्यातील चिंभळे येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी जयदीप सुरुंकर याला अटक केल्यानंतर, या घटनेतील फिर्यादी सुनील राजेंद्र गायकवाड (वय ३२) यालाच बेलवंडी पोलिसांनी आज संध्याकाळी अटक केली. फिर्यादी हा जखमीचा चुलतभाऊ आहे.

संतोष ऊर्फ लाला गायकवाड यांच्यावर मंगळवारी (ता. १०) सांयकाळी चिंभळे शिवारातील एका हॉटेलवर गोळीबार झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत गायकवाड आजही पुण्यात उपचार घेत आहेत. या घटनेत सुरुंकर याच्यासोबत असणाऱ्या सचिन भागवत (रा. चिंभळे) याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. आरोपी सुरुंकर याने गोळीबार केल्यानंतर जवळच एका शेतात पिस्तूल टाकून दिला होता.

या सगळे प्रकरण सुनील गायकवाड यानेच घडवून आणल्याची माहिती आरोपी सुरुंकर याने पोलिसांना दिल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी अधिक माहिती मिळवित आज

संध्याकाळी उशिरा गोळीबार प्रकरणातील फिर्यादी सुनील गायकवाड याला अटक केल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणारे उपनिरीक्षक मोहन गाजरे यांनी दिली.

जखमीचा जबाब

गोळीबारातील जखमी लाला गायकवाड यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार गोळीबार होत असताना सुनील गायकवाड याने आरोपी सुरुंकर याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. याशिवाय मिळालेल्या माहितीनुसार सुनील गायकवाड याच्याविरुध्द एका व्यक्तीने तक्रारी अर्जही दिला आहे. या सगळ्यांची माहिती घेताना बेलवंडी पोलिसांनी कुठलीही घाई न करता पुरावे जमा करूनच फिर्यादीला आरोपी करून अटक केल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT