ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : पथकाने पकडलेला वाळूचा ट्रक पळविला

शेवगावच्या महसूल पथकाकडून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे - अवैध वाळूवाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून तो श्रीगोंदे येथे नेताना शेवगावच्या महसूल पथकाला नऊ ते दहा जणांच्या टोळक्याने अडविले व ट्रक जबरदस्तीने पळवून नेल्याप्रकरणी दहा जणांविरोधात श्रीगोंदे पोलिस ठाण्यात, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या फिर्यादीनुसार पेडगाव येथे अवैधरीत्या वाळूउपसा अन वाहतूक सुरू असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली होती. वाळूउपशाविरोधात कारवाई करण्यासाठी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे, महसूल कर्मचारी श्रीकांत गोरे, मंगेश कदम यांचे पथक रविवारी सकाळी पेडगाव येथे गेले होते.

पथकाला पेडगाव येथे पांढऱ्या रंगाचा ट्रक (एमएच १२ एचडी १०१२) उभा असलेला दिसला. त्यामध्ये अवैधरीत्या उपसा केलेली वाळू असल्याचे दिसून आल्याने, अधिक चौकशी केली असता ट्रकमधील आसिफ शमसुद्दीन तांडेल (रा.पेडगाव) याने हा आपला ट्रक असल्याचे सांगितले.

ट्रकमध्ये अवैधरीत्या उपसा केलेली चार ब्रास वाळू असल्याने, कारवाईकामी तो श्रीगोंदे येथे नेण्याच्या सूचना पथकाने संबंधितास दिल्या. आरोपी तांडेल याने सहकाऱ्यांना फोन करून पेडगाव चौकात बोलावून घेतले. तांडेल याच्यासह नऊ ते दहा जणांच्या टोळक्याने ट्रकमध्ये बसलेले महसूल कर्मचारी गोरे व कदम यांना बळाचा वापर करून खाली खेचले आणि ट्रक पळवून नेला. महसूल पथकाने काही अंतर ट्रक व मोटारीतून पलायन केले.

काही अंतर गेल्यावर आरोपींनी मोटार रस्त्यावर सोडून पळ काढला. वाळूने भरलेला ट्रक मात्र पथकाच्या हाती लागला नाही. महसूल पथकाने मोटारसायकल ताब्यात घेऊन ती श्रीगोंदे पोलिसांच्या ताब्यात दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT