Ahmednagar news esakal
अहिल्यानगर

Ahmednagar : कांदा गडगडला.. शेतकरी रडला !

नेप्ती कांदा बाजारात एक लाख कांदा गोण्यांची आवक

सकाळ डिजिटल टीम

नगर तालुका : दादा पाटील शेळके नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात आज ९७ हजार ४९३ कांदा गोण्यांची आवक झाली. बाजारात गेल्या आठवड्यात साडेचार हजार रुपये क्विंटलने विकलेला कांदा आज तीन हजार दोनशे रुपयांवर आला. आठवडाभरात तब्बल दीड हजार रुपयांनी कांद्याचे दर कमी झाल्याने नगर व आष्टी तालुक्यांतील कांदा उत्पादक शेतकरी, शेतकरी संघटना यांच्या वतीने उपबाजार समिती समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

कांदा लागवडीपासून सातत्याने वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांना तोंड देत पीकवलेला कांदा काढणीला आला, त्यावर अवकाळी पावसाचा मारा झाला. काढणीला आलेल्या कांद्याच्या पाथीत अवकाळी पावसाचे पाणी झिरपल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच खराब झाला. अनेकांचा काढलेला कांदा पावसात भिजल्याने कांद्याच्या कलरवर मोठा परिणाम झाल्याने त्याचे परिणाम कांद्याचे भावावर झाले. गेल्या आठवड्यात सलग पाच दिवस पडलेल्या धुक्याचाही मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केल्याने अनेक संकटाना तोंड देऊन पिकवलेल्या कांद्याचे दर घसरले. गेल्या आठवड्यात साडेचार हजार रुपयांनी विकलेला खांदा आज तीन हजारांवर आल्याने कांदा उत्पादक संतप्त झाले आहेत.

शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

केंद्र सरकारने कांद्यावर केलेल्या निर्यातबंदीच्या विरोधात आज सकाळी बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात आष्टी व नगर तालुक्यांतील कांदा उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी बाजार समितीचे सचिव व केतवाली पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. कांद्याला दोन रुपये वाढवून मिळाले की लगेच कांदा निर्यातबंदी जाहीर करून मोकळे होतात. शेतकऱ्यांनी केलेला खर्च आणि झालेले उत्पादन, याचा ताळमेळ बसत नाही.

- विलास खटके, तालुकाध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना, आष्टी

अनेक व्यापाऱ्यांनी गेल्या आठवड्यात चढ्या भावाने कांदा खरेदी केला. या कांद्याची वाहतूक होत असतानाच निर्यातबंदी लागू झाल्याने अनेक कांदा व्यापारी अडचणीत सापडले आहेत.

- नंदकुमार शिकरे, अध्यक्ष, कांदा व्यापारी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT