The price of onion
The price of onion sakal
अहमदनगर

Ahmednagar : घोडेगावात कांद्याला दीड हजाराचा भाव

सकाळ वृत्तसेवा

सोनई : नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव (ता. नेवासे) उपबाजारात आज (रविवारी) ८० हजार ४६४ कांदा गोण्यांची विक्रमी आवक झाली. दीड हजार रुपयांच्या पुढे प्रतिक्विंटलला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.जून महिन्याच्या सुरुवातीपासून नगर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. मान्सूनचे आगमन वेळेत होऊनही वातावरणात उकाडा असल्याने चाळीत ठेवलेला कांदा खराब होईल, या भीतीने शेतकऱ्यांनी बाजारात कांदा आणला आहे. पेरणी खर्च, मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठीही काही शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणला आहे.

आजच्या लिलावात एक नंबर कांद्यास पंधराशे ते सतराशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला. मध्यम कांद्यास तेराशे ते पंधराशे रुपये,

गोल्टी कांद्यास पाचशे ते आठशे रुपये, तर जोड कांद्यास तिनशे ते सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला. लिलावात आलेल्या काही कांदा गोण्या दोन हजार रुपये क्विंटलने विकल्या गेल्या. लिलावानंतर कांदा ट्रकमध्ये भरण्यासाठी व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत ४३५ ट्रक कांदा उपबाजारातून हलविण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला आव्हान देण्यासाठी पंजाब सज्ज; आत्तापर्यंत कोणाचं पारडं राहिलंय जड

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT