PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

Shiv Sena UBT: "पण त्या पक्षाबरोबर आमची अनेक दशकांची युती होती. ती टिकवायची म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करायचो आणि आजही मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय."
PM Modi|Shivsena UBT|Uddhav Thackeray
PM Modi|Shivsena UBT|Uddhav ThackerayEsakal

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'एपी ग्लोबाले' आणि 'सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्याशी अभिजित पवार यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी शिवसेना उद्धव ठकारे पक्षाकडून होत असलेल्या वैयक्तीक टीकेबाबतही चर्चा झाली. त्यावर पंतप्रधानांनी ते वैय्यक्तिक टीकेला कधीही महत्त्व आणि प्रत्युत्तर देत नाहीत, असे सांगितले.

देशात असलेल्या माझ्या अनेक विरोधकांनी कायमच मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या जातीसाठी कायमच अपशब्द वापरले आहेत. तसेच त्यांनी अनेकवेळा माझ्या कुटुंबाच्या सुरुवातीच्या काळातील परिस्थितीची थट्टा केली आहे. पण या सर्व गोष्टींचा माझ्यावर कोणताही परिणाम झाला नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Modi|Shivsena UBT|Uddhav Thackeray
PM Modi Exclusive: महाराष्ट्रात भाजपाच्या जागा कमी होणार? विरोधकांच्या दाव्यावर मोदींचे थेट उत्तर

पुढे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून होणाऱ्या टीकेवर थेट बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले," आमची या पक्षाबरोबर युती होती तेव्हाही हे लोक अत्यंत वाईट बोलत माझा अपमान करायचे. पण त्या पक्षाबरोबर आमची अनेक दशकांची युती होती. ती टिकवायची म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करायचो आणि आजही मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय.

PM Modi|Shivsena UBT|Uddhav Thackeray
महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

यावेळी पंतप्रधानांनी कोणताही उल्लेख न करता शिवसेनेच्या फुटीवर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, त्या पक्षाकडून माझ्यावर अनेक वर्षांपासून वैयक्तिक टीका होत आहे. हा सर्व प्रकार जनतेला आवडलेला नाही. तसेच त्या पक्षातील त्यांंचे नेते, आमदार आणि खासदारांना हे पटले नाही. म्हणून या सर्वांनी आपले राजकारण बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गावर आणले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com