Ahmednagar news
Ahmednagar news esakal
अहमदनगर

Ahmednagar : शिधापत्रिका होणार इतिहासजमा; शासन देणार ई-शिधापत्रिका, राहत्‍या ठिकाणी मिळणार धान्य

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : शिधापत्रिकांऐवजी ई-शिधापत्रिका देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील सेतू, महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्रचालकांना लवकरच या प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे शिधापत्रिका आता इतिहासजमा होण्याच्या अखेरच्या टप्प्यावर आली आहे.

समाजातील गरीब आणि गरजू नागरिकांना धान्य देण्यासाठी शिधापत्रिका तयार करण्यात आली. एका कुटुंबासाठी एक शिधापत्रिका दिली जात होती. कुटुंबातील लहान आणि मोठ्या व्यक्तींच्या प्रमाणात धान्य दिले जात होते. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने वेगवेगळ्या योजनांद्वारे धान्य दिले जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य दिले जाते. अनेक कुटुंबे हे कामधंद्यानिमित्त मूळ गावी राहात नाहीत. त्यांची शिधापत्रिकेवर गावाकडचा पत्ता असे. त्यांना धान्यही गावाकडील स्वस्त धान्य दुकानात मिळत. मात्र, हे कुटुंब गावी राहात नसल्याने धान्य घेण्यासाठी त्यांना जाता येत नव्हते. शासनाचा मूळ हेतू साध्य होत नव्हता.

स्वस्त धान्य दुकानदारही बऱ्याचदा या कुटुंबासाठी आलेल्या धान्याची परस्पर काळ्या बाजारात विक्री करत. या गैरकृत्यांना प्रतिबंध करणे आणि गरीब कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी शिधापत्रिकांना बारा अंकी क्रमांक देण्यास सुरुवात करण्यात आली. बारा अंकी क्रमांकासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि हाताचे ठसे द्यावे लागतात. पुरवठा विभागाच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पाडली जात होती. बारा अंकी क्रमांकानंतर कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून हाताचा ठसे देऊन धान्य घेता येत होते. गोरगरिबांना सण, उत्सव साजरे करण्यासाठी ‘ आनंदाचा शिधा’ १०० रुपयांमध्ये दिला जात होता. ज्यांचे रेशन कार्ड हे ऑनलाईन केले आहेत. त्यांनाच या योजनांचा लाभ मिळत होता.

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली सर्व शिधापत्रिका प्रत्यक्षात देण्याचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या पुढील काळात ई-शिधापत्रिका दिल्या जाणार आहेत. ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत. त्यांना ई-शिधापत्रिका करून घेण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. मोबाईलवर ॲप डाऊनलोड करून या योजनेसाठी आवश्‍यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक आणि तहसीलदार या कागदपत्रांची पडताळणी करून ई-शिधापत्रिका मंजूर करणार आहेत. जे नागरिक संगणक साक्षर नाहीत किंवा ज्यांना मोबाईल ॲपमध्ये कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य नाही, अशा नागरिकांना सेतू, महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्रात जाऊन ई-शिधापत्रिकेसाठी कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत.

गैरप्रकारांना प्रतिबंध

शिधापत्रिका काढून देताना काही दलाल नागरिकांची फसवणूक करतात. आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना कोणताही थारा राहणार नाही. ॲपवर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्याची पडताळणी होणार आहे. या ठिकाणी ही बनावट कागदपत्रे दाखल करता येणार नाहीत.

जिल्ह्यात ११ लाख १३ हजार ३३३ एकूण शिधापत्रिका

अंत्योदय योजना

८७,९४७

प्राधान्य कुटुंब योजना

६,११,०९३

केशरी

३,५४,९७५

शुभ्र

५८,४१८

जिल्ह्यातील सेतू, महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्रचालकांना लवकरच प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर ई-शिधापत्रिका देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू होणार आहे.

- हेमा बडे, जिल्हा पुरवठा अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT