Ahmednagar News  Esakal
अहिल्यानगर

Ahmednagar:'अहमदनगरचं नाव आहिल्यानगर झालं', व्हॉट्‌स ॲप स्टेटसमुळे तरुणावर हल्ला, MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झाले, असे स्टेटस् व्हाट्‌स ॲपवर का ठेवले म्हणत तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१५) सायंकाळी एमआयडीसीतील हॉटेल रेजन्सीजवळ घडली.

सकाळ डिजिटल टीम

Ahmednagar Renamed As Ahilyanagar : अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झाले, असे स्टेटस् व्हाट्‌स ॲपवर का ठेवले म्हणत तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१५) सायंकाळी एमआयडीसीतील हॉटेल रेजन्सीजवळ घडली. याबाबत आर्यन देविदास शेवाळे (वय १८, रा. महादेव मंदिर, वडगाव गुप्ता शिवार) या तरुणाने फिर्याद दिली. एमआयडीसी पोलिसांनी ९ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

संतोष विनोद शिंदे, अक्षय तांबे, भोऱ्या, वसिम, वसिमचा भाऊ व इतर चार अशा नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी आर्यन शेवाळे हा तरुण चेतना कॉलनी येथे मित्राच्या बहिणीच्या हळदी समारंभासाठी गेला होता.

हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर आर्यन दुचाकीने घरी जात असताना हॉटेल रेजन्सीजवळील मोकळ्या जागेत आरोपींनी त्याला अडविले. संतोष शिंदे याने आर्यन याला शिवीगाळ केली. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झाल्याचे स्टेटस का ठेवले, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मोंढे करीत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT