Road construction sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : शहरातील रस्‍त्‍यांसाठी 'दहा कोटी' मंजूर

आमदार जगताप; भगवानबाबानगर ते गंगाटाॅवर्स तीन कोटी

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : अहमदनगर महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा विकास या योजनेअंतर्गत रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी मिळविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. या सर्व कामासाठी शासनाकडून शंभर टक्के निधी मिळणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

ते म्हणाले, की एप्रिल २०२२ च्या विवरणपत्रानुसार मनपा हद्दीतील शांती नगर ते भगवानबाबानगर ते गंगा टॉवर्स ते सचिननगर बिडवई घरापर्यंत कॉंक्रिटीकरण रस्ता विकसित करण्याकरिता तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सारसनगरमधील धनश्री बंगला ते सारस कॉलनी ते शिवगंगा टॉवर ते ससाणे घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

सारसनगरमधील वर्धमान रेसिडेन्सी ते जय बजरंग व्यायाम शाळा व कपिलेश्वर कॉलनी ते भगवान बाबा मंदिरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच बुरुडगाव रोडवरील चाणक्य चौक ते डॉक्टर कॉलनी पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. असा एकूण दहा कोटी रुपयांची विकास कामे सुरू होणार आहे.

यापुढील काळातही शहर विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे. विविध विकासकामांचे प्रस्ताव शासन दरबारी पाठविले आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व प्रस्तावाला मंजुरी मिळणार असल्‍याचे जगताप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant: खुनी सुधारू शकतो, पण सायबर गुन्हेगारांना जामीन नाही! सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, देशभरात खळबळ

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

Karul Ghat Truck Accident : करूळ घाटात ट्रक दरीत कोसळला, बाप-लेकाचा मृत्यू; सह्याद्री जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह काढले बाहेर

Kannad Taluka News: कन्नड तालुक्याला तिसऱ्यांदा महिला बालकल्याण सभापतीपदाचा मान; मिनाक्षी किशोर पवार यांची वर्णी!

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस धोक्याचे! राज्यातील 'या' जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT