अहिल्यानगर

अहमदनगर : भक्तीतून सजला साईंचा दरबार

आज अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने भाविकांनी दिवाळी साजरी

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : दिवाळीनिमित्त साईंच्या दरबाराची मोहक सजावट करून भाविकांनी बाबांविषयीची आपली श्रद्धा आज (गुरुवार) कलेच्या माध्यमातून प्रकट केली. पणत्या प्रज्ज्वलित करून दीपोत्सव साजरा केला. ज्या द्वारकामाईत बसून बाबा दिवाळीचा आनंद लुटत तेथे बाबांच्या काळातील दिवाळीचे दृश्य साकार करणारी सुबक रांगोळी रेखाटली. बाबांच्या दरबारात आज अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने भाविकांनी दिवाळी साजरी केली.

शहरातील साईनिर्माण ग्रुपचे उद्योजक विजय कोते व त्यांचे बंधू ताराचंद कोते यांनी पुढाकार घेऊन साईमंदिर व परिसरात फुलांची मोहक सजावट केली. त्यासाठी तब्बल पाच मेट्रिक टन फुलांचा वापर करण्यात आला. शिंगणापूर येथील साईभक्त गणेश शेटे यांनी साईमंदिर व परिसरातील मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली. मध्यप्रदेशातील साईभक्त अनिलभाई सिसोदिया यांनी द्वारकामाई व साईमंदिरात विविध कलाकुसरीच्या वस्तूंची सजावट केली.

प्रसिद्ध रांगोळीकार अविनाश बावणे व अन्य काही कलाकारांना ते येथे सोबत घेऊन आले. बावणे यांनी बाबांच्या काळातील दिवाळीचा अतिशय सुंदर देखावा रांगोळीच्या माध्यमातून साकारला. ही रांगोळी भाविकांचे आकर्षण ठरली. मंदिर परिसरात सुबक रांगोळ्या साकार करण्यासाठी स्थानिक कलाकार सृष्टी ठुबे, भरत विसपुते, कोमल रजपूत, सुनील बारहाते आदींनी परिश्रम घेतले.

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लक्ष्मीपूजन

साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज साई मंदिरात परंपरागत पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT