अहिल्यानगर

Balasaheb Thorat: 'खलनायक’ कोण हे जनतेला चांगलंच माहीत, निळवंडेच्या मुद्द्यावरुन बाळासाहेब थोरातांचा टोला

जलनायक आणि खलनायक कोण म्हटल्यावर तुमच्या मनात काय आले? हे सर्व जनतेला माहिती आहे, असा टोला माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

सकाळ डिजिटल टीम

Balasaheb Thorat on Nilwande Dam : निळवंडे धरणाचे काम कोणी केले, हे सर्वांना माहिती आहे. सत्ता बदलली म्हणून काही जण तिकडे जातात. निळवंडेसाठी जलनायक आणि खलनायक कोण, त्यांना माहिती आहे. मात्र, ते त्याचे श्रेय घ्यायला तयार नाहीत. जलनायक आणि खलनायक कोण म्हटल्यावर तुमच्या मनात काय आले? हे सर्व जनतेला माहिती आहे, असा टोला माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

लोहारे (ता. संगमनेर) येथे विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात वाचनालयाच्या उद्‍घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, अॅड. माधव कानवडे, महेंद्र गोडगे, गणपत सांगळे, प्रभाकर कांदळकर, संजय पोकळे, तारा सोनवणे, राहुल पोकळे, रेवणनाथ कदम, बाळासाहेब पोकळे, अरुण पोकळे, बाळासाहेब पोकळे, सुनील मुर्तडक, किसन रणमाळे, विजय रणमाळे, डॉ. संदीप पोकळे, शांताराम कदम, बाबासाहेब पोकळे आदी उपस्थित होते.

ते म्हणाले की, आपण कोणाचे वाईट केले नाही. संगमनेरचे तिकडे गेल्यावर त्यांना आनंद होतो. तिकडे काय चालले, हे सांगण्याची गरज नाही. निळवंडेसाठी आपण परिश्रम घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला. विकासासाठी सर्वांची साथ गरजेची असते, त्यासाठी एकजूट गरजेची असते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT