ahmednagar sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : सराफ बाजार रामभरोसे ; सराफी दुकान फोडून चोरट्यांकडून २५ लाख रुपयांचे सोने लंपास

नगर शहरात रविवारी घडलेल्या चोरीच्या घटनेनुळे सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - चोरट्यांनी मध्यवर्ती शहरातील सराफ दुकान फोडून तब्बल २४ लाख ६८ हजार रुपयांचे सोने लंपास केले. ही घटना आज पहाटे घडली. धारदार शस्त्र असलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेने सराफ बाजाराचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मध्यवर्ती शहरात सराफा व्यावसायिकांची सुमारे अडीचशे दुकाने आहेत. नगरसह इतर जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी सोने खरेदीसाठी येतात. असे असतानाही येथील सुरक्षा मात्र रामभरोसे आहे. या ठिकाणी यापूर्वी देखील चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेसाठी कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करावी,

तसेच परिसरातील बंद पडलेली पोलिस चौकी सुरू करावी, अशी सराफ व्यावसायीकांची अनेक वर्षांची मागणी आहे. परंतु पोलिस प्रशासनाने या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष केले. त्यामुळे चोरट्यांची मजल थेट सराफ दुकान फोडण्यापर्यंत पोहचली आहे.

आज पहाटे सहा ते सात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील तब्बल २४ लाख ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. चोरट्यांकडे धारदार शस्त्र असल्याचे रात्री ड्यूटीवर असलेल्या सुरक्षारक्षकांनी सांगितले. दुकानाचे मालक संतोष वर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सराफ बाजारातील दुकानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षेसाठी कायमस्वरूपी पोलिस आणि बंद पडलेली पोलिस चौकी कधी सुरू होणार? असा संतप्त सवाल सराफ व्यावसायिकांतून विचारला जात आहे.

७० मोठी दालनेही असुरक्षित

मध्यवस्तीतील गंजबारासह शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सोन्या-चांदीची सुमारे ७० मोठी दालने आहेत. या दालनांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक आहेत. मात्र, त्यांचे संख्याबळ व त्यांच्याकडील शस्त्रे पाहता ही दालने देखील सुरक्षित नाहीत.

सराफांमध्ये भीती

दरोडा टाकत सराफ व्यावसायिकाचा गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केल्याची घटना काही वर्षांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे घडली. संगमनेर, मांजरी या ठिकाणी देखील अशा घटना घडल्या आहेत. नगर शहरात रविवारी घडलेल्या चोरीच्या घटनेनुळे सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दृष्टिक्षेपात

एकूण सराफ दुकाने-

२५०

दुकानात सीसीटीव्ही-

८० टक्के

सुरक्षेसाठी खासगी गार्ड-

पोलिस कर्मचाऱ्यांची गरज

सराफ बाजारातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सहा-सात चोरट्यांनी आमचे दुकान फोडून २४ लाख ६८ हजार रुपयांचे सोने लंपास केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी मात्र दरोड्या ऐवजी चोरीचा साधा गुन्हा दाखल केला.

- संतोष वर्मा,

जिल्हाध्यक्ष, सराफ संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT