Sujay Vikhe Patil sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : विरोधकांना चंद्रावर पाठवा -डॉ. सुजय विखे

डॉ. सुजय विखे लोकसभेत कविता सादर करत विरोधकांवर टीकास्त्र

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी - अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज लोकसभेत चांद्रयान मोहिम-३ बाबत झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. त्यावर कविता सादर करत आणि काम नसलेल्या विरोधकांना थेट चंद्रावर पाठविण्याचा सल्ला देत रंग भरला.

१४ जुलै १९४२ ही क्वीट इंडीया चळवळीसाठी, १४ जुलै २०२४ ही चांद्रयान-३ मोहीमेसाठी आणि आता १४ जुलै २०२४ ही तारीख क्वीट इंडीया आघाडी यासाठी प्रसिध्द होईल, अशा शब्दात त्यांनी विरोधी पक्षावर हल्ला चढवीला.

त्यांच्या संसदेतील या भाषणाची चित्रफित आज सायंकाळपासून सोशल मिडीयावर व्हायरल होत होती. विरोधकांवर टीका करताना विखे पाटील म्हणाले, इस्त्रोचे शास्त्रज्ञ चुकांपासून शिकतात. भाजपचे विरोधक मात्र चुकांपासून धडा घेत नाहीत.

आम्ही सुर्ययान मोहिमेतील ‘सन’ची चर्चा करतो, ते आपआपल्या ‘सन’ची चर्चा करतात. २०२४ च्या निवडणुकीनंतर ज्या विरोधी नेत्यांना काम राहणार नाही, त्यांना खुशाल चंद्रावर पाठवून द्यावे. अटलजींनी चंद्रयान मोहीमेचे स्वप्न पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ते पूर्ण झाले.

महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या गोदरेज कंपनीने चंद्रयानाचे काही भाग तयार केले. दत्ता बीडकर या बीड जिल्ह्यातील कनिष्ठ शास्त्रज्ञाने या मोहीमेत सहभाग घेऊन स्व.गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण केले. शंभर महिला शास्त्रज्ञांनी महत्वाची भूमिका बजावली. यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये इस्त्रोतील महिला शास्त्रज्ञ भारताची अंतरीक्ष मंत्री असेल.

चंद्रयान मोहीम-२ अयशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्त्रोस भेट देऊन वैज्ञानिकांचा उत्साह वाढवला. पुर्वी चंद्रावर उतरलेली पहिला अंतराळवीर आर्मस्टॉग आणि देश रशिया हे आम्ही शिकत आलो. आता चंद्राच्या दक्षिण बाजूवर चंद्रयान उतरविणारा देश भारत, असे शिकता येईल.

असा केला भाषणाचा शेवट अंतरिक्ष मे गुंज उठे हम, चांद्रयान का गान लिए..चांद रंग तिरंगे मे रंगा, नयी एक पहचान लिए...मेरे भारत के वैज्ञानिक तुम हो गौरव भारत का..उंचा माथा लिए खडे हम, सच्चा एक अभिमान लिए...हि कविता सादर करून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT