अहिल्यानगर

चिंता वाढली! अहमदनगरमध्ये आढळला ओमिक्राॅनचा पहिला रुग्ण

संपर्कात आलेल्या ५५ नागरीकांचा शोध घेऊन सर्वांची कोरोना तपासणी करण्यात आली.

गौरव साळुंके

संपर्कात आलेल्या ५५ नागरीकांचा शोध घेऊन सर्वांची कोरोना तपासणी करण्यात आली.

श्रीरामपूर : नायजेरिया येथून श्रीरामपूरात आलेल्या एका ४५ वर्षीय महिलेचा ओमिक्राॅन तपासणी अहवाल नुकताच पाॅझिटीव्ह आला आहे. नोकरीनिमित्त नायजेरिया (वेस्ट आफ्रिका) मध्ये गेलेल्या महिलेसह तिचा सहा वर्षांचा मुलगा १५ डिसेंबर रोजी शहरात आले होते. ही माहिती स्थानिक आरोग्य विभागाला मिळाल्यानंतर १८ डिसेंबर रोजी त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने ओमिक्राॅन तपासणीसाठी तातडीने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या ५५ नागरीकांचा शोध घेऊन सर्वांची कोरोना तपासणी करण्यात आली.

त्यातील सर्वांचे तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आले. मात्र, आज (शुक्रवारी) दुपारच्या सुमारास सदर महिलेचा ओमिक्राॅनचा तपासणी अहवाल अखेर पाॅझिटीव्ह आल्याने आणखी धास्ती वाढली आहे. सदर महिला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत, असून सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागाने दिली.

'त्या' कुटूंबाचे कोरोना लसीकरण झालेले

आरोग्य विभागाने ओमिक्राॅन पाॅझिटीव्ह महिलेच्या कुटूंबातील पाच नागरिकांची कोरोना तपासणी केली. त्यातील सर्वजणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. तसेच सदर महिलेसह त्या कुटूंबाचे कोरोना लसीकरण झालेले असल्याने घाबरण्याचे कुठलेही कारण नसल्याचे तहसिलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले.

तात्काळ लसीकरण करुन घ्यावे

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्राॅन व्हायरस अतिशय वेगाने पसरतो. ओमिक्राॅनचा संसर्गाचा अतिशय वेगात पसरत असल्यामुळे सर्व नागरीकांनी विशेष काळजी घ्यावी. ज्या नागरीकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीकरण केलेले नाहीत. त्यांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण आणि मास्क वापरणे अतिशय गरजेचे असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. राजश्री देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT