zp school
zp school sakal
अहमदनगर

Ahmednagar : ज्ञानदान झाडाखाली अन् पडक्या खोलीत

सकाळ वृत्तसेवा

अकोले : रतनगडाच्या पायथ्याशी कुशीत वसलेल्या अमृतेश्वर मंदिराच्या अध्यात्मिक वातावरणात रतनवाडी हे गाव वसलेले. या गावात जिल्हा परिषदेची शाळा. ही शाळा सध्या अंगणवाडीच्या पडक्या इमारतीत, तर कधी झाडाखाली भरते. पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत २५ विद्यार्थी शिक्षण घेतात. उन्हाळा असला की झाडाखाली अन पाऊस आला की अंगणवाडीच्या पडक्या इमारतीत, तर कधी ग्रामपंचायतची इमारत. त्यामुळे या शाळेचा संगीत खुर्चीचा खेळ अविरतपणे सुरू आहे.

या शाळेवर दगडू मारुती बांबले आणि अशोक वंजारी असे दोन शिक्षक काम करत आहेत. उन, वारा, पावसात भौतिक सुविधा नसतानाही शाळेचा प्रवास सुरू आहे. रतनवाडी येथे सुमारे सहा हजार मिलिमीटर पाऊस पडतो. चार वाडीमध्ये गाव विभागलेले. शेतीमध्ये भात पीक हेच उत्पादन. पावसाळ्यात प्रचंड पाऊस. उन्हाळ्यात पाणी टंचाई. पूर्वी आश्रमशाळा होती, मात्र तिचे स्थलांतर मुतखेल येथे झाले. त्यामुळे येथील विद्यार्थी आता जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत.

शाळेला इमारत नसल्याने गावचे सरपंच संपत झडे यांनी सध्या अंगणवाडीची जुनी इमारत शाळेसाठी दिली. त्यात बसून शिक्षणाचे धडे विद्यार्थी गिरवत आहेत. हे गाव भंडारदरा धरणाच्या फुगवट्याजवळ आहे. शिक्षणाच्या सोयी सुविधा अपूर्ण असल्याने येथील विद्यार्थी व शिक्षक अनेक अडचणींना तोंड देत शिक्षणसाठी संघर्ष करताना दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT