This is Ahmednagar's corona score today
This is Ahmednagar's corona score today 
अहमदनगर

हा आहे नगरचा आजचा कोरोनाचा स्कोअर

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 207 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 54 हजार 53 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजची रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 95.94 इतकी आहे. नव्याने 260 कोरोनाबाधितांची भर पडली असून, जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 56 हजार 342 झाला आहे. त्यातील 861 जण मृत्युमुखी पडले आहेत. सध्या 1428 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात 43 बाधित निघाले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील 24, जामखेड एक, कोपरगाव एक, नगर ग्रामीण एक, नेवासे दोन, पारनेर तीन, पाथर्डी दोन व अन्य जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेतील अहवालात 48जण बाधित आढळले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील 14, अकोले दोन, कोपरगाव तीन, नगर ग्रामीण दोन, नेवासे एक, पारनेर दोन, पाथर्डी दोन, राहाता पाच, राहुरी दोन, संगमनेर 12, शेवगाव एक, श्रीरामपूर एक व कॅंटोन्मेंटमधील एकाचा समावेश आहे.

अँटिजेन चाचणीत 169 जण बाधित आढळून आले आहेत. त्यांमध्ये महापालिका हद्दीतील नऊ, अकोले 10, जामखेड एक, कर्जत पाच, कोपरगाव तीन, नगर ग्रामीण एक, नेवासे 12, पारनेर 24, पाथर्डी 10, राहाता आठ, राहुरी पाच, संगमनेर 57, शेवगाव तीन, श्रीगोंदे 14, श्रीरामपूर सहा, तसेच कॅंटोन्मेंटमधील एकाचा समावेश आहे. 

दरम्यान, जिल्ह्यातील 207 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील 20, अकोले 14, जामखेड आठ, कर्जत 26, कोपरगाव सात, नगर ग्रामीण दोन, नेवासे नऊ, पारनेर दोन, पाथर्डी 19, राहाता 18, राहुरी तीन, संगमनेर 32, शेवगाव 30, श्रीगोंदे 12, श्रीरामपूर तीन, कॅंटोन्मेंट एक, तसेच मिलिटरी हॉस्पिटलमधील एकाचा समावेश आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर
...... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; पाचव्या आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT