कोपरगाव : आषाढी एकादशीचे औचित्य साधून कलाशिक्षक अमोल बाळासाहेब निर्मळ यांनी कृष्ण तुळशी पानावर विठ्ठलाचे हुबेहूब देखणे रेखाचित्र रेखाटून विठ्ठला प्रतीचा भक्तिभाव व्यक्त केला आहे. आषाढी एकादशीची लगबग सर्वत्र सुरू असून, अनेक दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहेत. त्यातच अनेक कलाकार आपल्या पद्धतीने कलेच्या माध्यमातून विठ्ठला प्रति भक्तिभाव व्यक्त करत आहे.
कलाशिक्षक निर्मळ रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पिंपरी निर्मळ येथे कोपरगाव येथून बदलून आले आहेत. त्याचबरोबर या अगोदरही त्यांनी श्रीरामाचे व अनेक चित्र पिंपळाच्या पानावर रेखाटले आहे. अक्षरगणेश रेखाटन प्रकल्प व पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बनवणे कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण होते. त्यांनी राबविलेल्या सामाजिक विषयावर अनेक चित्र रेखाटून जनजागृती केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.