Anna Hazare  sakal
अहिल्यानगर

वाइनविक्री निर्णयाविरोधात अण्णा हजारे उपोषणावर ठाम

वाइनविक्री निर्णयाविरोधात सोमवारपासून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावना पाहता, वाइनविक्रीस सर्वांचा विरोध आहे. हा निर्णय सरकारने मागे घेतला नाही, तर मी सोमवारपासून (ता. १४) राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज (ता. ९) दुसरे स्मरणपत्र पाठविले. त्यात म्हटले आहे, की राज्य सरकारने वाइनविक्रीसंबंधी जो निर्णय घेतला, तो दुर्दैवी आहे. सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमधून वाइनविक्री सुरू करण्यात येणार आहे. केवळ महसूल विभाग, वाइनउत्पादक आणि विक्रेत्यांचे हित पाहून हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लहान मुले, तरुण व्यसनाधीन होऊ शकतात. महिलांनाही त्रास होऊ शकतो. वाइन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे, हेही आश्चर्यकारक आहे. राज्यभरातून वाइनविक्रीला विरोध होत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांत भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे संघटन आहे, तसेच राज्यातील विविध बिगरराजकीय, सामाजिक संघटना निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलनाच्या तयारीत आहेत, तरीही सरकारला जाग येत नसेल, तर आंदोलनाशिवाय पर्याय दिसत नाही.

संस्कृती धुळीला मिळेल

सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाइन ठेवली तर बालकेसुद्धा व्यसनाधीन होतील आणि अधोगतीकडे जातील. आमच्या साधूसंतांनी, राष्ट्रीय महापुरुषांनी संस्कृती जतन करून वाढविण्याचा प्रयत्न केला. दुकानांमध्ये वाइन आली तर ही आमची संस्कृती धुळीला मिळेल, असेही हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT