Another 1243 laborers from Uttar Pradesh were dispatched 
अहिल्यानगर

उत्तरप्रदेशमधील आणखी 1243 मजुरांना रवाना

सकाळ वृत्तसेवा

 नगर ः लॉकडाउनमुळे येथे अडकलेल्या परराज्यांतील 1243 मजुरांना आज नगर-गोंडा (उत्तर प्रदेश) श्रमिक एक्‍स्प्रेसने रवाना करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने मागील आठ दिवसांत तब्बल 6647 जणांची घरवापसी केली. 

कोरोनामुळे 23 मार्चपासून देशभर लॉकडाउन करण्यात आले. आता 17 मेपर्यंत लॉकडाउन असणार आहे. दरम्यान, लॉकडाउनमुळे अडकलेल्या मजुरांची घरवापसी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जिल्हास्तरावर मदत कक्ष स्थापन केला. त्याची जबाबदारी समन्वय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांच्याकडे आहे. 

मेच्या पहिल्या आठवड्यापासून परराज्यांतील मजुरांच्या घरवापसीचे काम सुरू आहे. यापूर्वी चार विशेष रेल्वे सोडल्या होत्या. आज दुपारी आणखी एक रेल्वे सोडण्यात आली. जिल्ह्यातील श्रमिकांना घेऊन नगर-गोंडा (उत्तर प्रदेश) एक्‍सप्रेस दुपारी दोन वाजता रवाना झाली. तीत अकोले, संगमनेर, नेवासे, श्रीगोंदे तालुक्‍यांत अडकलेल्या व्यक्तींचा समावेश होता. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, सुधाकर भोसले, रोहिणी नऱ्हे, तहसीलदार रूपेश सुराणा, अमोल निकम, मुकेश कांबळे, चंद्रशेखर शितोळे आदी उपस्थित होते. 
 

आतापर्यंत रवाना मजूर 
राजस्थान - 134 
उत्तर प्रदेश - 5146 
मध्य प्रदेश - 1163 
झारखंड -25 
आंध्र प्रदेश -60 
तमिळनाडू - 05  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT