Balasaheb Thorat  sakal
अहिल्यानगर

Balasaheb Thorat : मंत्री विखेंनीच संगमनेरातून लढावे , बाळासाहेब थोरातांचे पिता-पुत्रांना खुले आव्हान

Balasaheb Thorat : संगमनेरमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांनी डॉ. सुजय विखे यांना आव्हान देत त्यांच्या पिता राधाकृष्ण विखे यांना निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांच्यापेक्षा त्यांचे पिता राधाकृष्ण विखे यांनीच निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.

संगमनेर तालुक्यातील कोळेवाडी येथे आदिवासी मेळाव्याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना आमदार थोरातांनी भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे संगमनेर विधानसभा निवडणूक लढवण्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांच्यापेक्षा त्यांचे पिता थेट विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनीच येऊन निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान दिले.

याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या बैठक झाल्या आहेत. विजयादशमीपर्यंत सर्व चर्चा पूर्ण होईल, असे थोरातांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडून स्वतंत्र लढणार, अशा चर्चा सुरू आहेत. यावर थोरातांनी महाविकास आघाडी पक्की असून, सत्तेवर येणार असल्याचा ठाम विश्‍वास व्यक्त करत चर्चा कुठून येतात माहीत नाही, असे म्हटले.

डॉ. जयश्री थोरात रिंगणात?

आमदार बाळासाहेब थोरतांची कन्या डॉ. जयश्री थोरात संगमनेरमधून विधानसभेच्या रिंगणात उतरणार याची चर्चा सुरू आहे. यावर त्यांनी पुन्हा एकदा गुगली टाकत याबद्दल अजून काही ठरलेले नाही, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: 'Vaping'चा वाद अन् पेटला रियान पराग! ८ चौकार, ५ षटकारांसह कुटल्या ९० धावा... राजस्थान रॉयल्सने उभे केले तगडे लक्ष्य

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT